मुंबई : बीडचे निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. संबंध महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडसंदर्भात हा दावा कासले यांना केला आहे. त्यात त्यांनी वाल्मीक कराडचा एन्काउंटर करण्याची मला ऑफर होती, असे म्हटले आहे. त्यांच्या या व्हिडीओने महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी खळबळ उडण्याची चिन्हे आहेत.(Valmik’s encounter plan)
बोगस एन्काउंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि ५० कोटींची ऑफर दिली जाते असेही कासले यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सध्या राज्यात सर्वत्र हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलिस निरीक्षक होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहेत. आता वाल्मीक कराडच्या एन्काउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
एन्काउंटरसाठी १० ते ५० कोटी
कासलेंनी व्हिडीओमध्ये पोलिस प्रशासन आणि राजकीय नेत्यांना हादरवून सोडणारे दावे केले आहेत. कासले यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलेय की, मी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची बातमी पाहिली. या ५ पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा असं कोर्टाने म्हटलं. एसआयटी बसवून काही उपयोग होणार नाही. चौकशी करायची असेलच तर केंद्राची यंत्रणा बसवा, मग त्यातून सत्य बाहेर पडेल. फेक एन्काऊंटर कसे होतात हे मी सांगतो. ज्यावेळी मला वाल्मीक कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती पण मी नकार दिला. एन्काउंटरसाठी मोठी रक्कम ऑफर दिली जाते, १०, २०, ५० कोटी इतके दिले जातात. तुम्ही बोलाल तेवढे पैसे देतात. मी सायबर शाखेत होतो, पण मी हे करू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी मला ऑफर दिली होती असे त्यांनी म्हटले आहे. (Valmik’s encounter plan)
अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेकच
व्हिडीओत ते म्हणतात, तसेच मी मोठेपणा सांगत नाही. परंतु फेक एन्काउंटर करताना ४ लोकांची टीम असते, त्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह सचिवांची गुप्त बैठक होते. त्यात काय करायचे हे ठरते. मग त्यानंतर ५-६ विश्वासू लोकांची टीम बनते. ती संबंधित ठिकाणी जाते, म्हणजे अक्षय शिंदेचे झाले तसे, तिथे १ अधिकारी, २-३ अंमलदार अशी आणखी एक टीम तयार केली जाते. त्यांना ५,१०, १५ कोटी मोठी रक्कम एकाच वेळी दिली जाते. त्यानंतर या घटनेची चौकशी आपलेच सरकार करेल, त्यातून तुम्हाला मुक्त करू अशी वचने दिली जातात अशाप्रकारे बोगस एन्काउंटर घडवून आणले जातात, असा दावा रणजीत कासले यांनी केला. (Valmik’s encounter plan)
दरम्यान, आरोपीच्या हातात बेड्या असतात. त्याशिवाय दोरखंडाने हात-पाय बांधलेले असतात. अक्षय शिंदेचा एन्काउंटर किती बोगस होता असेही कासले यांनी सांगितले. बीड पोलिस दलात कासले कार्यरत होते. त्यांचे निलंबन झाले आहे. त्यानंतर ते अनेक व्हिडिओ सोशल मीडियात टाकत असतात.
मुख्यमंत्री बीडला यायला घाबरतात
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बीडला यायला घाबरतात, असा दावाही कासले यांनी केला आहे. पंकजा मुंडेंच्या प्रचाराची सभा झाली तिला पंतप्रधान आले. पण फडणवीस आले नाहीत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार आणि विरोधकही नपुंसक आहेत, असा गंभीर आरोप करून आता जनतेनेच आवाज उठवला पाहिजे, असे ते या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.
हेही वाचा :
बॉम्बने गाडी उडवण्याची सलमानला धमकी
१८०० कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त