Udayanraje : जीभ हासडा, गोळ्या घाला

Udayanraje

महाराष्ट्र दिनमान डेस्क : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीका केली आहे. अशा माणसांची जीभ हासडली पाहिजे, त्यांना ठार मारले पाहिजे, अशा तिखट शब्दांत उदयनराजे कडाडले. (Udayanraje)

सोलापूरकर यांनी एका यू ट्यूब चॅनेलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल म्हणाले होते की, ‘महाराज आग्य्राहून सुटले ते मिठाईच्या पेटाऱ्यांतून नव्हे, तर महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या, याचे पुरावे आहेत. त्यांनी औरंगजेबाच्या वजीर आणि बायकोलाही लाच दिली. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले आणि त्यांच्या परवान्यांची खूणही आहे. गोष्टी रूपात ते रंजक करून सांगितले जाते. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही’. (Udayanraje)

सोलापूरकरांच्या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. इतिहास संशोधकांनी सोलापूरकर यांच्या वक्तव्याचे खंडन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी सोलापूरकरांवर टीका केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सोलापूरकर यांच्या घरावर मोर्चा काढला. सोलापूरकरांनी या वक्तव्याबद्दला माफीही मागितली आहे. पण त्यांच्या वक्तव्याचा वाद शमलेला नाही. (Udayanraje)

सोलापूरकरांच्या वक्तव्याबद्दल उदयनराजे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “सोलापूरकरांच्या वक्तव्याबद्दल मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना होत आहेत. महाराजांनी लाच घेऊन सुटका करून घेतल्याचे सोलापूरकर म्हणाले. हा राहुल सोलापूरकर म्हणजे कोण आहे? असे लोकं जे लाच घेतात त्यांना लाचेपलीकडे काही समजत नाही. जीभेला हाड नसतं मला माहिती आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला… काहीही बोलायचं… अशा लोकांच्या जीभा हासडल्याच पाहिजेत. जे-जे महापुरुषांबद्दल असे विधान करतात, ते कुणीही असोत, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे. दिसंल तिथं ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे.”

देशात महापुरुषांबद्दल बोलण्याची विकृती वाढली आहे. त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे यांनी सांगितले. अशा प्रकारचे विधान करणाऱ्यांवर देशद्रोहाचे कायदा लावा, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (Udayanraje)

उदयनराजे म्हणाले की, अशा लोकांचे चित्रपट हाणून पाडले पाहिजेत. चित्रपट क्षेत्रातील निर्माते आणि दिग्दर्शकांनी या लोकांना थारा देऊ नये. या लोकांना गाडले पाहिजे. हा या देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. मला जर विचारलं तर मला असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारले पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे-जे लोकं असतील त्या सर्वांना… या शब्दात उदयनराजे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

हेही वाचा :

कृषीमंत्रिपदाच्या काळात मुंडेंकडून १६१ कोटीचा घोटाळा

संपूर्ण महायुती सरकारच भ्रष्ट

 

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या