Kolhapur Crime : भूतबाधेची भिती दाखवून वृध्देला लुटणाऱ्या दोन मुलांना अटक

कोल्हापूर;  प्रतिनिधी : भूतबाधा झाली आहे असे भिती दाखवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक तोळ्याची सोन्याची चेन आणि मोटारसायकल असा पावनेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. (Kolhapur Crime)

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एका वृध्द महिलेला गाठून दोघे संशयितांनी तुम्हाला भूतबाधा झाली आहे. तुम्हाला दुष्टाची नजर लागली आहे. आम्ही करणी उतरवून देतो असे सांगून महिलेला घाबरवले. त्यानंतर महिलेला गळातील सोन्याची चेन काढून देण्यास सांगितले. महिलेने गळातील सोन्याची चेन काढून त्या मुलांना दिली.  सोन्याची चेन मुठीत धरुन काही मंत्र पुटपुटल्यासारखे करुन जवळ असलेल्या एका दगडाखाली सोन्याची चेन ठेवली. थोड्या वेळाने तुम्ही ती चेन परत घ्या, तुमची भूतबाधा निघाली आहे, असे सांगून हातचलाखी करुन दोघांनी मोटारसायकलवरुन पळ काढला. वृध्द महिलेला दगडाखाली सोन्याची चेन मिळाली नाही. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठले. या गुन्ह्याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली होती.

फसवणूक, चोरी, घरफोडीचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला  फसवणुकीतील सोन्याची चेन विक्रीसाठी दोघे संशयित तावडे हॉटेललगत शाहू सांस्कृतिक हॉलच्या कंपाउंड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वृध्द महिलेची फसवणूक केल्याच्या  गुन्हाची कबुली दिली. या गुन्हाच्या तपास एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद कळमकर, पोलिस उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस हवालदार विलास किरोळकर, सचिन पाटील, संजय पडवळ, संजय कुंभार, लखन पाटील, सागर माने, महेश पाटील, विजय इंगळे, शुभम संकपाळ, महेश खोत, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, हंबीरराव अतिग्रे यांनी केला. (Kolhapur Crime)

हेही वाचा :

Related posts

Shah Nadda : ‘इंडिया’च्या फेक नॅरेटिव्हविरोधात आघाडी उभारा

Solar power plant कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज

plane crash अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कोसळले