Manmohan सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

manmohan

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ.  मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. भारताचे आर्थिक चित्र बदलून टाकणाऱ्या या महान नेत्याला देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. शुक्रवारी होणारे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दुखवटा काळात देशभरात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे. (Manmohan)

डॉ. सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे.(Manmohan)

शनिवारी, दि. २८ डिसेंबर रोजी  सकाळी ९.३० वाजता काँग्रेस मुख्यालयापासून डॉ. सिंग यांची अंत्ययात्रा सुरू होईल, असे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. त्यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

गुरुवारी उशिरा निधन झालेल्या माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. डॉ. सिंग यांची एक मुलगी परदेशात आहे. त्या परत आल्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी सांगितले.(Manmohan)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांनी डॉ. सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन आदरांजली वाहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी, आपचे नेते अरविंद केजरीवाल, आदी नेत्यांनी आदरांजली वाहिली.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांनीही डॉ. सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.

 

Related posts

Compensation: स्पोर्ट्स शूज घातले म्हणून तिला कामावर काढून टाकले, पण…

Newzealand : न्यूझीलंडची पहिल्या ‘टी-२०’त बाजी

manmohan singh : विकास धोरणकर्ते