श्रीनगर : सुरक्षिततेच्या कारणामुळे जम्मू काश्मीरमधील ४८ पर्यटनस्थळे आणि रिसॉर्टस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू काश्मीर सरकारने हा निर्णय घेतला आहे. काश्मीरमधील स्लीपर सेल पुन्हा सक्रीय झाले असून पुन्हा पर्यटन स्थळांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Tourist Destination)
आठवड्यापूर्वी काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे काश्मीरकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे सुरक्षिततेच्या कारणास्तव जम्मू काश्मीरमधील ४८ पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला. (Tourist Destination)
जी पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहे ती जागा सुंदर दऱ्या खोऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे दूधपात्री आणि वैरीनागसारख्या पर्यटनस्थळांवर बंदी घातली आहे. या भागातील रिसॉर्टस् बंद करण्यात करण्यात आली आहे. सुरक्षा दलाच्या सल्ल्यानंतर जम्मू काश्मीर सरकारने हा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा हल्ला होऊ शकतो असा अंदाज गुप्तचर खात्याने व्यक्त करण्यात आल्याने राज्यातील ८७ पैकी ४८ पर्यटनस्थळ बंद करण्यात आले आहेत. पहेलगाम खोऱ्यात दहशतवादी पुन्हा सक्रीय झाले आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (Tourist Destination)
बांदीपोरा जिल्हा – गुरेझ व्हॅली (स्थानिक पर्यटक वगळता बंद), बडगाम जिल्हा – युसमार्ग, तोसामैदान, दूधपाथरी, कुलगाम जिल्हा – अहरबल, कौसरनाग, कुपवाडा जिल्हा – बंगस व्हॅली, कारीवान देवर, चंडीगाम, हंदवाडा जिल्हा – बांगस व्हॅली, सोपोर जिल्हा – वुलर तलाव, रामपोरा आणि राजपोरा, चैरहार, मुंडजी-हमाम-मारकुट धबधबा, खांपू, बोस्निया, विझिटॉप, अनंतनाग जिल्हा – सूर्य मंदिर, मत्तन, वेरीनाग गार्डन, सिंथन टॉप, मार्गन टॉप, आकड पार्क, बारामुल्ला जिल्हा – हब्बा खातून पॉइंट (कावनेर), बाबा ऋषी, रिंगावली, गोगलदरा, बंदरकोट, श्रुंज धबधबा, कमांड पोस्ट, नंब्लान वॉटरफॉल, इको पार्क, खदानियार, पुलवामा जिल्हा – संगरवानी, श्रीनगर जिल्हा – जामिया मस्जिद, नोहट्टा, बदमवारी, राजौरी कादल (हॉटेल काना), आली कडाल (जेजे फूड रेस्टॉरंट), आयव्हरी हॉटेल, गंडताल (थीड), पदशापाल रिसॉर्ट (फकीर गुजरी), चेरीफ रिसॉर्ट, चेरी ट्रीफ रिसॉर्ट (फकीर गुजरी) (अस्तनमार्ग पॅराग्लायडिंग पॉइंट), फॉरेस्ट हिल कॉटेज, इको व्हिलेज रिसॉर्ट, अस्तनमार्ग व्ह्यू पॉइंट, अस्तानमार्ग पॅराग्लायडिंग स्पॉट, मामनेथ आणि महादेव हिल्स (फकीर गुजरी मार्गे), बौद्ध मठ, हरवानगंथनम, डी फार्म डी. (कायमगाह रिसॉर्ट), गांदरबल जिल्हा – लचपत्री लॅटरल, हँग पार्क, नारनाग. (Tourist Destination)
हेही वाचा :