TMC hits back at Modi : मणिपूर, पेपर लीकवर बोला; मोदींना टीएमसीचे प्रत्युत्तर

TMC hits back at Modi

कोलकात्ता : मुर्शिदाबाद आणि मालदा येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या घटनांतून तृणमूल काँग्रेस क्रूर राजवट दिसून येते. या राजवटीची सामान्य नागरिकांच्या दुःखांबद्दल उदासीनता दिसून येते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२९ मे) केली. अलीपूरद्वार येथे एका रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी यांच्या टीकेला तितक्याच ताकदीने तृणमूल काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. (TMC hits back at Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अपयशांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करून तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) मोदींना पाच प्रश्न विचारले आहेत.

‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये, पक्षाने पंतप्रधान मोदींना मणिपूरमधील ‘‘गोंधळ निस्तरण्याचे’’ आवाहन केले आहे. या राज्यात दोन वर्षांहून अधिक काळ कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे. ‘‘चला तथ्यांवर बोलूया,’’ असे तृणमूल काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर म्हटले आहे. (TMC hits back at Modi)

इतर मुद्द्यांकडे वळताना पक्षाने म्हटले, ‘‘महिलांची सुरक्षा? उन्नाव ते हाथरस पर्यंत, @BJP4India चा ट्रॅक रेकॉर्ड मौन आणि लज्जेने भरलेला आहे.’’ ‘‘तरुणाईची निराशा? पेपर लीक, NEET घोटाळा आणि ४५% बेरोजगारी – भाजपने विद्यार्थ्यांना दिलेली राष्ट्रीय भेट,’’ असे पक्षाने म्हटले आहे.

‘‘भ्रष्टाचार म्हणाल तर तुमचे अर्धे मंत्रिमंडळ जामिनावर आहे,’’ याकडे लक्ष वेधत भ्रष्टाचाराचा आरोप मोदी मंत्रिमंडळावर उलटवला.

‘‘तुमच्या (मोदी) सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणामुळे बंगालला मनरेगा आणि आवास योजनेचा निधी नाकारण्यात आला,’’ असा दावाही तृणमूलने केला आहे. (TMC hits back at Modi)

मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना,  राज्य हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अराजकतेने ग्रासले आहे. आणि लोक आता ‘निर्मळ सरकार’ (क्रूर सरकार) पासून बदलाची आस धरत आहेत, असे म्हटले होते. (TMC hits back at Modi)

ते म्हणाले की, मुर्शिदाबाद आणि मालदा येथील जातीय हिंसाचाराच्या घटना सामान्य नागरिकांच्या दुःखांबद्दल तृणमूल काँग्रेस सरकारच्या भयानक ‘क्रूरता आणि उदासीनतेची’ आठवण करून देतात. ‘‘आज, पश्चिम बंगाल अनेक संकटांशी झुंजत आहे. लोकांना ‘निर्मळ सरकार’ नको आहे. त्यांना बदल आणि सुशासन हवे आहे. म्हणूनच संपूर्ण बंगाल म्हणत आहे की त्यांना आता क्रूरता आणि भ्रष्टाचार नको आहे,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा :
एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही : हवाई दल प्रमुख
अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर