Threat to Salman: सलमानच्या घरात घुसणाऱ्या दोघांना अटक

Threat for Salman

मुंबई : विशेष प्रतिनिधी : अभिनेता सलमान खानचा चाहता असल्याचे सांगत त्याच्या वांद्रे येथील घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बुधवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. (Threat to Salman)

आरोपींमध्ये छत्तीसगडचा एक २३ वर्षीय युवक आणि मुंबईतील खार येथील ३२ वर्षीय महिला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा युवक सकाळी इमारतीच्या गेटवर पहिल्यांदा आला. त्याने तो त्याचा चाहता असल्याचे सांगितले. त्याला सलमानला भेटायचे असे तो सांगत होता.

गेटवर तैनात असलेल्या एका हवालदाराने त्याला आत येण्यास नकार दिला तेव्हा त्याने रागाच्या भरात त्याचा मोबाईल फोन फोडला.

त्याच संध्याकाळी, संध्याकाळी ७:३० च्या सुमारास, तीच व्यक्ती परत आली आणि एका रहिवाशाचे वाहन अडवून आत घुसण्याचा प्रयत्न केला. (Threat to Salman)

तो इमारतीच्या आवारात घुसण्यात यशस्वी झाला आणि इमारतीकडे धावला, परंतु तो सलमानच्या घरी पोहोचण्यापूर्वीच कर्तव्यावर असलेल्या सतर्क पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला अडवले.

 “त्याला मुख्य प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. तो अभिनेत्याच्या घरात शिरला नाही,” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्या युवकाला वांद्रे पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिताच्या (BNS) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. (Threat to Salman) दुसऱ्या एका घटनेत, वांद्रे पोलिसांनी खार येथील एका महिलेला अटक केली. तीही सलमानच्या घरात घुसण्याचा सतत प्रयत्न करत होती. तिची चौकशी केली सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :
राण्या राव प्रकरणात परमेश्वर यांच्यावर ईडी कारवाई
इस्त्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्याची हत्या

Related posts

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?