लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच खात्यावर वर्ग होणार

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आता येत्या काही दिवसातच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठीचा आवश्यक निधी खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आधार सिडींग राहिलेल्या १२,८७,५०३ पात्र महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ पात्र महिलांना या महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. (Ladki Bahin Yojana)

लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर महायुती सरकारने ऑगस्ट महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये प्रत्येक महिलाच्या खात्यावर देण्यात आले.

४ महिन्याच्या हप्ता वर्ग केल्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमत मिळाले. दरम्यान, निवडणुकीनंतर ही योजना सुरू राहील की, नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. महायुती आणि महाविकासा आघाडीने जाहीर नाम्यात महिलांना २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी लागणारे अतिरिक्त निधीच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली. (Ladki Bahin Yojana)

याबाबत महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेमुळे महिलांना सन्मान निधी मिळून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल आणि त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. राज्य शासन महिलांच्या सशक्तीकरणासाठी कटिबद्ध असून, या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्याबरोबरच आत्मसन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास मिळेल.

हेही वाचा :

Related posts

E crop :‘ई पीक’ पाहणीला ‘नेटवर्क’चा अडथळा

Municipal election ठाकरे गटाने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली!

Solar power plant कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज