दोघा पोलिसांचे मृतदेह गोळ्या झाडलेल्या अवस्थेत सापडले

उधमपूर : जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरमध्ये रविवारी सकाळी अधिकाऱ्यांना पोलिस वाहनात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे गोळ्या झाडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उधमपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांना मारण्यासाठी एके-४७ रायफलचा वापर करण्यात आला. उधमपूरचे एसएसपी आमोद अशोक नागपुरे यांनी, हे दोघे पोलीस सोपोरहून तलवाडा प्रशिक्षण केंद्राकडे जात होते. हा हत्या आणि नंतर आत्महत्येची घटना असावी, असा अंदाज आहे. तथापि, घटनेमागील सत्य शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी ‘एएनआय’ला सांगितले. (Jammu Kashmir)

रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. ते सोपोरहून तलवाडा येथील प्रशिक्षण केंद्राकडे जात होते. प्राथमिक तपासानुसार, या घटनेत एके-४७ रायफल वापरल्याचे सिद्ध झाले आहे. दोघांचे मृतदेह विच्छेदन आणि अन्य प्रक्रियेसाठी उधमपूरच्या जनरल मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात येणार असल्याचे एसएसपी नागपुरे यांनी सांगितले.

गेल्या महिन्यातही असाचा प्रकार आढळला होता. एक मृतदेह सापडला होता. जम्मूच्या किश्तवाड भागात दहशतवाद्यांनी अपहरण करून त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. सुरक्षा दलांनी या दोन ग्राम संरक्षण रक्षकांचे (व्हीडीजी) मृतदेह बाहेर काढले होते. दोघे बेपत्ता झाल्यानंतर सुमारे २४ तासांनंतर सुरक्षा दलांना त्यांचे मृतदेह पोंडगवारी पजम्रिसरात सापडले. (Jammu Kashmir)

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले