Thackeray Shinde together : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे प्रथमच एकत्र  

Thackeray Shinde together

मुंबई : प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभानंतर फोटोसेशन झाले. शिवसेनेच्या फुटीनंतर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोटोसेशनच्यावेळी एकत्र आल्याचे पहायला मिळाले. त्यावेळी ठाकरे यांनी शिंदेच्या जवळ बसण्याऐवजी निलम गोऱ्हे यांना बसण्यास सांगून शिंदेंच्या जवळ बसण्याचे टाळल्याचे चित्र पहायला मिळाले. (Thackeray Shinde together)

फोटोसेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधान सभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबाबास दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे खूर्चीवर बसले होते. त्यांच्या मागे मंत्री व सर्वपक्षीय आमदार उभे होते. फोटोसेशन सुरू होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या आगमन झाले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांना अभिवादन करुन ते खूर्चीवर बसण्यास निघाले असताना एकनाथ शिंदे आणि राम शिंदे उभे राहून बोलत होते. ठाकरे यांनी शिंदेकडे कटाक्षही टाकला नाही. शिंदेंच्या शेजारी असलेल्या खूर्चीवर उद्धव ठाकरे यांना बसण्यास सांगितले. पण ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उप सभापती निलम गोऱ्हे यांना बसण्यास सांगितले. शिंदे आणि ठाकरे यांच्या खूर्चीत एक खूर्चीचे अंतर पहायला मिळाले. (Thackeray Shinde together)

फोटो सेशननंतर एकनाथ शिंदे पुढे निघून गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस, राम शिंदे, नार्वेकर यांच्या मागे जाऊन त्यांना थांबवले. त्यांना अभिवादन करुन ते परतले. पण या फोटोसेशनच्यावेळी ठाकरे आणि शिंदे एकत्र आल्याचे पहायला मिळाले. (Thackeray Shinde together)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक