Test Draw : बांगलादेश-श्रीलंका कसोटी अनिर्णित

Test Draw

गॉल : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला सामना शनिवारी अनिर्णितावस्थेत संपला. बांगलादेशने यजमान श्रीलंकेसमोर विजयासाठी २९६ धावांचे आव्हान ठेवल्यानंतर श्रीलंकेने अखेरच्या दिवशी ४ बाद ७२ धावांपर्यंत मजल मारली. (Test Draw)

बांगलादेशने चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद १७७ धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी कर्णधार नजमुल शांतोने झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर बांगलादेशने ६ बाद २८५ धावांपर्यंत मजल मारून डाव घोषित केला. शांतोने सलग दुसऱ्या डावात शतक झळकावताना १९९ चेंडूंमध्ये ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १२५ धावांची खेळी केली. बांगलादेशने पहिल्या डावामध्ये १० धावांची आघाडी घेतल्यामुळे श्रीलंकेसमोर विजयासाठी २९६ धावांचे अवाहन होते. (Test Draw)

दुसऱ्या डावात श्रीलंकेने झटपट चार विकेट गमावल्या. अखेरचा कसोटी सामना खेळणारा श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजलो मॅथ्यूज ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर, कमिंदू मेंडिस आणि कर्णधार धनंजय डिसिल्वा यांनी श्रीलंकेचा डाव सावरत दिवसअखेरपर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवला. बांगलादेशतर्फे ताजिउल इस्लामने ३ विकेट घेतल्या. दोन्ही डावांत शतक झळकावणारा शांतो सामनावीर ठरला. या मालिकेतील दुसरी कसोटी २५ जूनपासून कोलंबोमध्ये खेळवली जाणार आहे. (Test Draw)

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश – पहिला डाव ४९५ आणि दुसरा डाव – ८७ षटकांत ६ बाद २८५ (घोषित) (नजमुल शांतो नाबाद १२५, मुश्फिकूर रहीम ४९, शादमन इस्लाम ७६, थरिंदू रत्नायके ३-१०२, मिलन रत्नायके १-२६) अनिर्णित विरुद्ध श्रीलंका – पहिला डाव ४८५ आणि दुसरा डाव – ३२ षटकांत ४ बाद ७२ (पथुम निसंका २४, कमिंदू मेंडिस नाबाद १२, धनंजय डिसिल्वा नाबाद १२, ताजिउल इस्लाम ३-२३, नईम हसन १-२९).

हेही वाचा :
भारताची धावसंख्या साडेचारशेपार; पंतचे शतक
भारत इंग्लंड ट्रॉफीचे ‘बारसे’

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर