Taipei Open : आयुष, उन्नतीचे आव्हान संपुष्टात

Taipei Open

तैपेई : आयुष शेट्टी आणि उन्नती हुडा या भारतीय बॅडमिंटनपटूंना तैपेई ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. या दोघांच्या पराभवाबरोबरच भारतीय बॅडमिंटनपटूंचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. (Taipei Open)

जागतिक क्रमवारीत ४४ व्या स्थानी असणाऱ्या २० वर्षीय आयुषने या स्पर्धेमध्ये सनसनाटी निकाल नोंदवत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर अग्रमानांकित तैपेईच्याच तिएन चेन चोऊचे आव्हान होते. चोऊ जागतिक क्रमवारीत ७ व्या स्थानी आहे. शनिवारी उपांत्य सामन्यात चोऊने आयुषला ४२ मिनिटांमध्ये २१-१८, २१-१७ असे नमवले. उपांत्य सामन्याच्या दोन्ही गेममध्ये आयुषने कडवा प्रतिकार केला. परंतु, चोऊच्या वेगवान खेळासमोर त्याचा निभाव लागला नाही. (Taipei Open)

महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात जपानच्या अग्रमानांकित तोमोका मियाझाकीने उन्नतीवर ४३ मिनिटांमध्ये २१-१९, २१-११ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत १७ वर्षीय उन्नती ५३ व्या, तर १८ वर्षीय मियाझाकी ८ व्या स्थानावर आहे. उपांत्य सामन्याच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली. हा गेम २१-१९ असा जिंकून मियाझाकीने सामन्यात आघाडी घेतली. दुसरा गेम जिंकण्यासाठी मात्र तिला फारसे प्रयास पडले नाहीत. हा गेम २१-११ असा जिंकत मियाझाकीने विजयावर शिक्कामोर्तब केले. (Taipei Open)

हेही वाचा :
मला निवृत्त व्हायचंय!

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक