Suicide in Jail : बालिकेच्या मारेकऱ्याची कारागृहात आत्महत्या

Suicide in Jail

Suicide in Jail

कल्याण : प्रतिनिधी :  कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. डिसेंबर २०२४ मध्ये कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात एका बालिकेवर अत्याचार करुन विशाल गवळीने तिची निर्घुन हत्या केली होती. बालिकेची हत्या करणाऱ्या विशाल गवळीला फाशी द्या, मागणीसाठी लोक रस्त्यांवर उतरले होते. (Sucide in Jail)

विशाल गवळीला तळोजा तुरुंगात ठेवले होते. कोठडी लगतच्या स्वच्छतागृहात विशाल गवळीने गळफास लावून आत्महत्या केली. आज रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. तळोजा तुरुंग प्रशासनाने ही माहिती खारघर पोलिसांना कळवली. त्यांनी विशाल गवळीच्या कल्याणमधील कुटुंबियांना ही माहिती दिली. (Sucide in Jail)

पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करुन उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल गवळी याच्यावर दोन महिन्यापूर्वी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी पावले उचलली होती. ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. या गुन्ह्यात आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी हिला शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी महत्पूर्ण पुरावे गोळा केले होते. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात सुरू होती. (Sucide in Jail)

खटल्याची माहिती

डिसेंबर २०२४ मध्ये कल्याण चक्कीनाका परिसरातील तेरा वर्षाची बालिका घरातून दुकानात खरेदीसाठी गेली होती. तिच्यावर पाळत ठेवणाऱ्या विशाल गवळीने त्या बालिकेला अमिष दाखवून स्वत: च्या घरात नेले. तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर राहत्या घरी बालिकेचा खून केला. संध्याकाळी कामावरुन परतलेल्या पत्नी साक्षी गवळीच्या मदतीने विशालने बालिकेचा मृतदेह कल्याण भिवंडी मार्गावरील बापगाव हददीत फेकून दिला होता. (Sucide in Jail)

या घटनेने राज्य हादरुन गेले. हत्येनंतर विशाल पळून गेला. तो पत्नी साक्षीचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात शेगाव येथे पळून गेला. वेषातंर करुन पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला एका केशकर्तनालयातून अटक कली होती. या गुन्ह्यात विशालला मदत करणारी तिची पत्नी साक्षी हिलाही अटक करण्यात आली. (Sucide in Jail)

हेही वाचा :

अमित शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख

भूषण गवई होणार सरन्यायाधीश

Related posts

Two locals identified

Two locals identified: दोघा स्थानिकांच्या मदतीने घडविला हल्ला

Pahelgaum attack

Pahalgam attack: दहशतवाद, धर्म आणि राजकारण

Two terrorist killed

Two terrorist killed : दोघा दहशतवाद्यांना टिपले