Subroto Mukherjee : सुब्रतो मुखर्जी १७ वयोगट फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूलने जिंकली

Subroto Mukherjee

 कोल्हापूर : सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वयोगट मुलांच्या स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूलने जिंकली. त्यांनी अंतिम सामन्यात प्रायव्हेट हायस्कूलचा ३-० असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित ही स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू आहेत. (Subroto Mukherjee)

अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने प्रायव्हेट हायस्कूलचा ३-० असा पराभव केला.  महाराष्ट्र कडून शुभम कांबळे, सम्राट मोरबाळे आणि स्वरूप सुतार यांनी प्रत्येकी  एक गोल केला. तत्पुर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात  महाराष्ट्र हायस्कूलने कोल्हापूर हायस्कूल संघावर २-० असा विजय मिळवला.  महाराष्ट्र कडून शुभम कांबळे,  सम्राट मोरबाळे यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रायव्हेट हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयावर  टायब्रेकरमध्ये ३-२ असा विजय मिळवला. पूर्णवेळेत सामना शून्य गोलबरोबरीत होता. (Subroto Mukherjee)

स्पर्धा नियोजनाचे कामकाज क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे सुरेश चव्हाण हे करत आहेत. बक्षिस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, प्रशासनाधिकारी डी सी कुंभार, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी  क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन सेक्रेटरी प्रदीप साळोखे, प्रायव्हेट हायस्कुल उपमुख्याध्यापक श्री जोशी, रघु पाटील, डी सी पाटील, लहू अंगज सुनील पवार यांच्या उपस्थितीत झाले.  विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांक विजयी संघास राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू कै. अवधूत घारगे यांचे स्मरणार्थ श्री राजेंद्र घारगे यांचे कडून आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. (Subroto Mukherjee)

स्पर्धेत पंच म्हणून  निरंजन कामते, ऋषिकेश दाभोळे, संदीप पाटील, रोहन कांबळे,  पृथ्वीराज अवघडे,  सतीश भोसले,  योगेश सरनाईक,  संकेश साळोखे,  अजिंक्य गुजर,  अवधूत गायकवाड,  गौरव माने,  गजानन मनगुतकर यांनी पाहिले.

महाराष्ट्र हायस्कूल  विजयी संघ : नील मांडेकर,  शुभम कांबळे, प्रतीक पाटील, प्रथमेश बडगुजर, प्रणव यादव, सम्राट मोरबाळे, स्वरूप सुतार, पृथ्वीराज साळोखे, साईराज पाटील, मंथन देसाई, अजय वडर, केदार सोनाळे, सर्वेश गवळी, संकेत जाधव, विवेक पाटील, संचित उपलानी, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, व्ही एस पाटील, मार्गदर्शक संतोष पवार, शरद मेढे, सूर्यजीत घोरपडे.

Related posts

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक