जमीर काझी : मुंबई: भारतीय नौदलाकडे असलेल्या एकूण पाणबुड्यांपैकी जवळपास १५ पाणबुड्यांचे आयुष्य हे आता केवळ ७ ते ८ वर्षापर्यंतच मर्यादित आहे. याशिवाय ३ ते ४ पाणबुड्या पुढील ५ वर्षात निवृत्त कराव्या लागतील अशा अवस्थेत आहेत. मात्र नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून एकही पाणबुडी निर्मिती वा खरेदीचा निर्णय घेतलेला नाही, हे खरे आहे का? याचा खुलासा मोदी सरकारने करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे. (Submarine approved)
ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांनी जुलै २०२३ मध्ये फ्रान्स दौऱ्यानंतर तीन स्कॉर्पीन प्रकारच्या पाणबुड्यांचा करार झाल्याचे सरकारतर्फे घोषितही केले होते. ३० हजार कोटीच्या माझगाव डॉक सोबत झालेल्या करारास वर्ष उलटले तरीही केंद्रीय अर्थ खात्याने अजूनही मंजुरी दिलेली नाही, याचा खुलासा मोदी सरकारने करावा, अशी मागणीही गाडगीळ यांनी केली आहे. (Submarine approved)
मोदी सरकारकडून सीमेचे रक्षण करणाऱ्या सैन्याच्या युद्धसामुग्रीसाठी वर्षानुवर्षे मंजुरीच मिळत नाही हे वरील बाबीतून सिद्ध होते अशी टीका करून अनंत गाडगीळ म्हणाले, ‘इंदिराजींच्या सरकारच्या काळात बॅ. विठ्ठलराव गाडगीळ संरक्षण उत्पादन मंत्री असताना अवघ्या दोन वर्षात माझगाव डॉकने तीन फ्रिगेट्स व एका पाणबुडीचे जलावतरण केले होते.’ (Submarine approved)