Stock Market : शेअर बाजार वधारला

Stock Market

Stock Market

मुंबई : प्रतिनिधी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतासह जगभरातील शेअर बाजार गडगडले. पण आज मंगळवारी शेअर बाजारात आश्वासक सुरूवात झाली असून भारतीय स्टॉक मार्केटमध्ये निफ्टी ४०० अंकांनी तर सेन्सेक्स एक हजार अंकांनी वधारला. (Stock Market)

सोमवारी भारतीय शेअर बाजारात हडकंप पहायला मिळाला होता. सेन्सेक्स २२२६ हून अधिक अंकांनी तर निफ्टी ७४२ अंकांनी कोसळला होता.  गुंतवणूकदारांना १४ लाख कोटींचा फटका बसला होता. पण आज शेअर बाजाराची सुरुवात बंपर तेजीसह झाली. सेन्सेक्स १२०० अंकांनी तेजीसह वधारला. बँक निफ्टीही अंदाजे ८०० अंकानीं वधारला. निफ्टी मिडकॅप १०० मध्ये एक हजार अंकांची वाढ झाली. बाजारपेठेत सर्वत्र खरेदी सुरू झाली आहे. निफ्टीचे पन्नासपैकी पन्नास शेअर ग्रीन मार्कमध्ये उघडले. बीईएल, टाटा स्टील, टाटा मोटर्स, टायटन, जेएसडब्ल्यू स्टीलमध्येही वाढ झाली आहे. सकाळी अकरा वाजता बीएसई सेस्नेक्स ७४३.१९ अंकांनी १.०२ टक्के तेजीने ७३,८८१.०९ अंकांवर ट्रेड करत होता. अदानी पोर्टस् च्या शेअर चार टक्क्यांनी वधारला. निफ्टीच्या शेअर्समध्ये टायटन, अदानी पोर्टस्, बजाज फायनान्स, टाटा स्टील, अक्सिस बँक आणि टाटा मोटर्समध्ये तेजी आली आहे. (Stock Market)

सोमवारी जागतिक बाजारपेठेतील मंदीनंतर मंगळवारी अशियाई बाजारात तेजी पहायला मिळाली. त्यांचे पडसाद भारतीय शेअरबाजारावरही पडले. जपानच्या निक्केई २२५ निर्देशक सुरवातीच्या व्यापारात सहा टक्क्यांहून अधिक वाढला. काल सोमवारी हा आठ टक्क्यांनी घसरला होता. (Stock Market)

दरम्यान टेरिफवरुन अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुध्द अधिक तीव्र होण्याचे संकेत दिले आहे. अमेरिकेच्या टेरिफ धोरणाविरुध्द चीनने प्रत्युत्तर देत अमेरिकन उत्पादनावर ३४ टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. चीनने अमेरिकन उत्पादनावर लावलेली ३४ टक्के करवाढ मागे घेतली नाही तर अमेरिका चीनवर ५० टक्के टॅरिफ लावेल, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. चीनला उद्या मंगळवारी ८ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. जर चीनने टॅरिफ मागे घेतले नाही तर ९ एप्रिलपासून चीनवर ५० टक्के टॅरिफ लावेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. जर चीनने अमेरिकेवर प्रत्युत्तरात्मक शुल्क रद्द केले नाही तर ५० टक्के कर लावण्याची धमकी दिली आहे. (Stock Market)

दरम्यान गेल्या आठवड्यात जाहीर केलेले टॅरिफ कमी करण्यासाठी ५० हून अधिक देशांनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला आहे. टॅरिफमुळे जागतिक गोंधळ उडाला असून बाजारात अस्थिरता आली असतानाही आपले व्यापार धोरण बदलणार नाहीत यावर ट्रम्प ठाम आहेत. (Stock Market)

हेही वाचा :

चीनला ५० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी

Related posts

Kiran Rijiju

Kiran Rijiju: ‘वक्फ’मुळे गरीब-गरजू मुस्लिमांना न्याय

Bumrah, Mandhana

Bumrah, Mandhana : बुमराह, मानधनाचा सन्मान

Terror attack in J&K

Terror attack in J&K: दहशतवादी हल्ल्यात २० वर पर्यटक ठार