राज्य सरकारकडे शहरातील रस्त्यांसाठी ५० कोटी निधी : आमदार अमल महाडिक

कोल्हापूर, प्रतिनिधी : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यावर त्यांच्याकडे शहरातील रस्त्यांसाठी ५० कोटी निधींची मागणी करणार असून शहरातील रस्ते नीट करण्याचा प्रयत्न राहील, असे मत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारासंघातील भाजपचे नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले. फुलेवाडी रिंगरोड कामाचा शुभारंभ आमदार महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

गेले अनेक महिने फुलेवाडी रिंगरोडचे काम रेंगाळले होते. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार महाडिक यांच्या हस्ते झाला. या रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला असून जिल्हा नियोजन मंडळातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यासाठी दोन किलोमीटरच्या कामाला आज गुरुवारपासून सुरुवात झाली.  आमदार महाडिक म्हणाले,  गेल्या पाच वर्षात प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याचे काम आम्ही करणार आहोत. आज या कामाचा शुभारंभ करत असून रस्त्यांसाठी आणखी निधी लागणार आहे.  सरकार स्थापन झाल्यानंतर. शहरातील सर्व रस्त्यांसाठी ५० कोटी रुपयांची आम्ही मागणी केली आहे. लवकरात लवकर हा निधी आणून शहरातील रस्ते नीट करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल असेही आमदार अमल महाडिक म्हणाले आहेत. यावेळी माजी नगरसेवक सत्यजीत कदम, अमोल माने, भाजपचे अशोक देसाई महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्रीपदासाठी आग्रही नाही

राज्यात सत्ता स्थापनेमध्ये कोणताही विलंब झालेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल असून वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन तिन्ही नेते निर्णय घेतील आणि लवकरच सत्ता स्थापन होईल. तसेच जिल्ह्यात मंत्री पदासाठी कोणताही आग्रह आम्ही केला नसल्याचे आमदार अमल महाडिक यांनी म्हटल आहे.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी