नवी दिल्ली : इस्रायल-इराण संघर्षावर भारताचे मौन अस्वस्थ करणारे आहे. स्वतंत्र पॅलेस्टाईनची कल्पना मांडणाऱ्या शांततापूर्ण तोडग्याचे समर्थन भारताने प्रदीर्घ काळ केले आहे, अशी आठवण काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी करून दिली. भारताने खणखणीत भूमिका मांडली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. (Sonia Gandhi on War)
या दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या संघर्षावर श्रीमती गांधी यांनी ‘द हिंदू’मध्ये लेख लिहिला आहे. त्याआधारे त्यांची भूमिका मांडणाऱ्या बातम्या प्रसृत झाल्या आहेत.
सोनिया गांधी म्हणाल्या, ‘‘इस्रायलसह स्वतंत्र पॅलेस्टाइनची कल्पना करणाऱ्या शांततापूर्ण द्वीपक्षीय तोडग्याचं भारताने प्रदीर्घ काळापासून समर्थन केलेले आहे. मात्र, सध्याच्या सरकारने आपल्या तत्वनिष्ठ वचनबद्धतेचा त्याग केल्याचे दिसते.’’ (Sonia Gandhi on War)
इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेधही सोनिया गांधी यांनी केला आहे. इस्रायल हा अणुसज्ज देश आहे, दुसरीकडे इराणकडे अणुबॉम्ब असता कामा नये, असे सांगत या देशाला लक्ष्य केले जात आहे. इस्रायलची ही दुटप्पी भूमिका आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (Sonia Gandhi on War)
इराण हा आपला खूप जुना मित्र आहे. आताच्या संघर्षाच्या काळात भारताने दाखवलेले मौन अस्वस्थ करणारे आहे. अद्यापही वेळ गेलेली नाही. गाझामध्ये सुरू असलेला विध्वंस आणि इराणवर होत असलेले हल्ले यांबाबत भारताने स्पष्ट, जबाबदार आणि खणखणीत आवाजात भूमिका मांडली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
१३ जून २०२५ रोजी इस्रायलने सर्व संकेत मोडून काढत इराणवर एकतर्फी हल्ला केला. तो बेकायदा आणि मध्य पूर्वेतल शांततेसाठी अत्यंत धोकादायक आहे. काँग्रेस या हल्ल्याचा निषेध करते.
सोनिया गांधी म्हणतात…
- गाझावरील इस्रायलकडून होणारे हल्लेही क्रूर आणि एकतर्फी आहेत. त्यामुळे अस्थैर्य वाढेल.
- अमेरिकेची कधीही न संपणारी युद्धे आणि मिलिट्री-इंडस्ट्रियल लॉबीच्या वाढत्या प्रभाव यावर एकेकाळी टीका करणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही आता त्याच मार्गावर चालले आहेत.
- इस्रायल हा स्वत:च एक अणुशक्ती असलेला देश आहे. त्याने शेजारी देशांवर सातत्याने लष्करी कारवाई केल्या आहेत. त्याचा इतिहास मोठा आहे. (Sonia Gandhi on War)
- इराण भारताचा खूप जुना मित्र आहे. दोन्ही देशांदरम्यान घनिष्ठ संबंध आहेत. इराणने अनेकदा भारताची पाठराखण केली आहे. १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये जम्मू-काश्मिर प्रश्नासंबंधी भारतावर टीका करणारा प्रस्ताव आला होता. त्यावेळी हा प्रस्ताव रद्द करण्यात इराणने आपल्याला मदत केली होती.
हेही वाचा :
निव्वळ घोषणा; कर्तृत्व कुठाय?: मोदींवर टीका
राऊत यांच्याकडून ‘बोलबच्चन’ वक्तव्याचा समाचार