Six terrorists killed : सहा दहशतवाद्यांचा खात्मा

Six Two terrorists

श्रीनगर : एकीकडे भारत पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधीमुळे शांतता असताना दुसरीकडे भारतीय लष्कराने दहशतवाद्याचा कंबरडे मोडण्याचा चंग बांधला आहे. काश्मीरममध्ये भारतीय लष्कराने दोन वेगवेगळ्या आपॅरेशन्समध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. (Six terrorists killed)
काश्मीरचे आयजीपी व्ही.के. बर्दी यांनी पत्रकारा परिषदेत दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईची माहिती दिली.

ते म्हणाले, गेल्या ४८ तासांत आम्ही दोन अतिशय यशस्वी कारवाया केल्या आहेत. या दोन्ही कारवाया केरन आणि त्राल या भागात केल्या आहेत. या कारवाईत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवादाचे अड्डे नष्ट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. (Six terrorists killed)
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यांनंतर भारतीय लष्कार, सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. भारताने पाकिस्तानमध्ये नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्ताने शस्त्रसंधी मोडून सीमा नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला. एकीकडे गोळीबार सुरू असताना भारतीय हद्दीत दहशतवाद्यांचा घुसवण्याचे प्रयत्न सुरू होते. नियंत्रण रेषेवर धुमश्चक्री उडाली असतानाही सीमा सुरक्षा दलाने सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहा दहशतवाद्यांना ठार केले होते.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर