Sindhu : सिंधू, सात्विक-चिराग यांची विजयी सलामी

Sindhu

जकार्ता : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशिया ओपन स्पर्धेमध्ये महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय नोंदवला. सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या भारतीय जोडीने पुरुष दुहेरीत विजयी सलामी दिली. लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय हे खेळाडू पुरुष एकेरीमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाले. (Sindhu)

सिंधूने पहिल्या फेरीमध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराचा चुरशीच्या लढतीत २२-२०, २१-२३, २१-१५ असा पराभव केला. सव्वा तासापेक्षा अधिक रंगलेल्या या लढतीमध्ये सिंधूने पहिला गेम २२-२० असा जिंकून आघाडी घेतली. मात्र, ओकुहाराने तोडीस तोड खेळ करत दुसरा गेम २३-२१ असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये सिंधूने ओकुहाराला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. हा गेम २१-१५ असा जिंकून सिंधूने विजय निश्चित केला. पुढील फेरीत तिचा सामना थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चॉचुवाँगशी होईल. महिला एकेरीतील भारताच्या अन्य खेळाडूंचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. दक्षिण कोरियाच्या किम जीईने अनुपमा उपाध्यायला २१-१५, २१-९ असे नमवले. थायलंडच्या आठव्या मानांकित सुपानिदा काटेथाँगने रक्षिता रामराजवर १४-२१, २१-१५, २१-१२ अशी मात केली. मालविका बनसोडने इंडोनेशियाच्या पुत्री वार्दानीविरुद्ध २१-१६, १६-१५ अशी आघाडी असताना दुखापतीमुळे माघार घेतली. (Sindhu)

पुरुष दुहेरीमध्ये सात्विक-चिराग या भारताच्या आघाडीच्या जोडीने इंडोनेशियाच्या लिओ कार्नांडो-बॅगस मौलाना या जोडीचा १८-२१, २१-१८, २१-१४ असा पराभव केला. या सामन्यात पहिला गेम गमावल्यामुळे पिछाडीवर पडलेल्या भारतीय जोडीने त्यानंतरचे लागोपाठ दोन गेम जिंकत १ तास ७ मिनिटांमध्ये विजय नोंदवला. पुरुष एकेरीत मात्र मंगळवारी भारतीय बॅडमिंटनपटूंच्या हाती अपयश आले. इंडोनेशियाच्या अल्वी फरहानने प्रणॉयवर अवघ्या ४५ मिनिटांमध्ये २१-१७, २१-१८ अशी मात केली. लक्ष्यसमोर पहिल्याच फेरीत चीनच्या अग्रमानांकित यू क्वी शीचे कठीण आव्हान होते. हे आव्हान लक्ष्यला पेलवले नाही आणि त्याला ११-२१, २२-२०, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. (Sindhu)

हेही वाचा :
गुकेशचा कार्लसनवर सनसनाटी विजय

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर