साखरेचा दर ६० ते ७५ रुपये; २० हजार कोटी रुपयांचा काळाबाजार?

Significant rise in sugar prices

दिल्ली : प्रतिनिधी : ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रति किलो ५५ ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पुढील महिन्याभरात साखरेचा दर प्रतिकिलो ९० रुपयांवर पोहोचण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारात साखरेचा तुटवडा जाणवू लागल्याने केंद्र सरकारने १० लाख मेट्रिक साखर आयातीस परवानगी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मात्र दरवाढीमागे मुठभर कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी २० ते २२ हजार कोटी रुपयांचा मोठा काळाबाजार होत असल्याचा आरोप केला आहे. (Significant rise in sugar prices)

महिनाभरात साखरेच्या दरात १३ टक्के वाढ

साखरेचे दर एक महिनाभरात वाढू लागले आहेत. साखरेचा दर १३ टक्क्यांनी महाग झाली आहे. यंदा जगभरात उसाचे उत्पन्न घटल्याने साखरचे उत्पादनही कमी झाले आहेत. तसेच उसाचा वापर इथेनॉलसाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने साखरेचे उत्पन्न घटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दहा वर्षात प्रथम भारताला साखर आयात करण्याची वेळ आली आहे.  

साखरेच्या साठ्यावर मर्यादा

दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरकारने साखरेच्या साठवणुकीवर मर्यादा कडक केल्या आहेत. सरकारने नवीन आदेश काढला असून व्यापाऱ्यांना दर महिन्याला १० मेट्रिक टनापेक्षा जास्त साखरेचा व्यापार किंवा वापर करतात, त्यांना आता जास्तीत जास्त १५ दिवस पुरेल इतकीच साखर बाळगण्याची परवानगी दिली आहे. एक सप्टेंबरपासून हा नवीन नियम लागू होईल आणि ३० नोव्हेंबरपर्यंत अंमलात राहील. (Significant rise in sugar prices)

मिठाई महाग होण्याची शक्यता

साखर महागल्याने सर्वसामान्यांना फटका बसणार आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने गोडधोड पदार्थ तयार करण्यासाठी साखरेचा वापर जास्त केला जातो. श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात मिठाईसाठी साखरेचा वापर होत असल्याने मिठाईचे दर महाग होण्याची शक्यता आहे.  

२० ते २२ हजार कोटींचा काळाबाजार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर दरात अचानक वाढीवर संताप व्यक्त केला आहे. या दरवाढीमागे २० ते २२ हजार कोटी रुपयांचा काळाबाजार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुठभर कारखानदार आणि सट्टेबाज व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी कुत्रिम टंचाई आणि दरवाढ निर्माण केली जात आहे असा आरोप केला आहे. साखरेचा गैरव्यवहार करुन १५० कोटी जनता आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटले जात असून सारा नफा कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या घशात घातला जात आहे असा आरोपही त्यांनी केला.  

कमी दराने साखर खरेदी करुन गोदामात लपवली ?

सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढवायचे आधीच निश्चित झाले होते असा आरोप शेट्टी यांनी केला. मंदीच्या काळात व्यापाऱ्यांनी कमी दराने साखर खरेदी करुन ती कारखान्यांच्या गोदामात लपवून ठेवली आहे. आता भाव वाढल्यावर कारखानदार आमच्याकडे स्टॉक नाही असा कांगावा करत आहेत असा आरोपही त्यांनी केला. साखरेचे दर वाढल्याने कारखानदारांनी दुसरा हप्ता ५०० रुपये द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. (Significant rise in sugar prices)

Related posts

मुंबईत फ्रेंच महिलेला ९८ लाखाला खोटा हिरा विकला

राहूल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच अभाविप, एनएसयुआय कार्यकर्ते भिडले

विवेकानंद संस्था ठरवेल पुणे शिक्षक मतदार संघाचा आमदार