Shehbaz Sharif: पहेलगाम हल्ल्याच्या ‘तटस्थ चौकशी’साठी तयार

FILE PHOTO: Pakistan's Prime Minister Shehbaz Sharif speaks during the COP27 climate summit in Egypt's Red Sea resort of Sharm el-Sheikh, Egypt November 8, 2022. REUTERS/Thaier Al-Sudani/File Photo

इस्लामाबाद : पहेलगाम दहशतवादी घटनेवरून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या हल्ल्याची तटस्थ चौकशी करण्यासाठी पाकिस्तान तयार आहे, अशी हमी दिली. जम्मू आणि काश्मीर जिल्ह्यातील पहेलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला.(Shehbaz Sharif)

शनिवारी (२६ एप्रिल) अबोटाबाद येथील लष्करी अकादमीत एका समारंभात शरीफ बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पाकिस्तान कोणत्याही तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे.’’

तथापि, त्यांनी असे प्रतिपादन केले की पाकिस्तानी सैन्य ‘‘कोणत्याही चुकीच्या कृतीविरुद्ध देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास पूर्णपणे सक्षम आणि सज्ज आहे. आम्ही फेब्रुवारी २०१९ मध्ये भारताच्या घुसखोरविरूद्ध असेच उत्तर दिले होते.’’ (Shehbaz Sharif)

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी न्यू यॉर्क टाईम्सला सांगितले की इस्लामाबाद ‘‘आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी केलेल्या कोणत्याही तपासात’’ सहकार्य करण्यास तयार आहे.

पहलगामजवळील बैसरन येथे झालेल्या हल्ल्यात २६ लोक मृत्युमुखी पडले, ज्यात बहुतेक नागरिक होते. दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर उपाययोजनांची घोषणा केली. यामध्ये सिंधू जल करार निलंबित करणे समाविष्ट आहे. भारत सरकारने अटारी सीमेवरील एकात्मिक तपासणी नाका बंद केला. तसेच भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयांची एकूण संख्या कमी केली. (Shehbaz Sharif)

अटारी सीमेवरून देशात प्रवेश करणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना १ मे पर्यंत देश सोडण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, आसिफ यांनी दावा केला की भारताने ‘‘देशांतर्गत राजकीय हेतूंसाठी’’ सिंधू जल करार रद्द करण्यासाठी दहशतवादी हल्ल्याचा वापर केला. त्यांनी म्हटले की भारत सरकारने ‘‘कोणत्याही पुराव्याशिवाय आणि तपासाशिवाय’’ इस्लामाबादला शिक्षा करण्यासाठी पावले उचलली.

“आम्हाला हे युद्ध भडकू नये असे वाटते. कारण या युद्धाच्या भडक्याने या प्रदेशावर आपत्ती येऊ शकते,’’ असे आसिफ यांनी ‘न्यू यॉर्क टाइम्स’शी बोलताना सांगितले.

भारताचा इशारा

विशेष म्हणजे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे वचन दिले आहे आणि म्हटले की नवी दिल्ली ‘‘पृथ्वीच्या शेवटापर्यंत दहशतवाद्यांचा पाठलाग करेल.’’

“आज, बिहारच्या मातीतून मी संपूर्ण जगाला सांगतो. भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढेल आणि त्यांना शिक्षा करेल. आम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवाद शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही,’’ असे पंतप्रधान म्हणाले.

हेही वाचा :
गुजरातेत सापडले हजारावर बांगला देशी
 आम्ही सरकारच्या पाठीशी, पण निर्णय तडीस न्या

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या