Satyagrah Padyatra : आरएसएसचा वैचारिक पराभव : सपकाळ

Satyagrah Padyatra

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली; तर असत्य आणि हिंसा ही संघाची विचारधारा आहे. देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार संघ व संघ परिवाराने केला. तोच संघ आज महात्मा गांधी यांना शरण गेला. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव आहे, अशी टीका काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. (Satyagrah Padyatra)

नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरु झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पदयात्रा पुन्हा सुरु झाली. दुपारी सावंगी येथे विश्रांती घेण्यात आली. रात्रीचा मुक्काम खडकी येथे आहे. पदयात्रेत सपकाळ यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री वसंत पुरके, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र मुळक, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भोयर, सरचिटणीस संदेश सिंघलकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. (Satyagrah Padyatra)

यावेळी सपकाळ म्हणाले की, खोटे बोलून भाजपा सत्तेत आला आहे पण महात्मा गांधी नावाचा संत भाजपा व आरएसएसच्या मानगुटीवर बसला आहे. संघाच्या १०० व्या वर्षी सुवर्णयोग आलेला असून भारताचे संविधान व महात्मा गांधी यांचे विचार संघाने स्वीकारावे असे आवाहन काँग्रेसने केले आहे पण त्याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे,

आशिया चषक भारताने काही पहिल्यांदाच जिंकलेला नाही परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र यातही राजकारण करण्यांची संधी सोडली नाही. हवा असो, पाणी असो किंवा खेळ असो नरेंद्र मोदी ध्रुवीकरण करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतात हे त्यांच्या एक्सवरील पोस्टवरून स्पष्ट होते. भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, पण देशाची प्रतिष्ठा असते ती मोदी जपत नसल्याची टीका त्यांनी केली.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर