साताऱ्याच्या साहिल जाधव, चिखिता थानिप्रती जोडीने पटकावले सुवर्ण

Sahil Jadhav and Chikhita Thaniparthi won gold

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जपानमधील नागोवा अशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तिरंदाजीमध्ये डंका वाजवला आहे. भारतीय महिला संघाने कपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर काही तासातच मिश्र कंपाउंड प्रकारात साताऱ्याचा साहिल जाधव आणि चिखिता थानिप्रथी या जोडीने मिश्र दुहेरी तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावले. बुधवारच्या सकाळच्या सत्रात तिरंदाजीत दोन तर शूटिंगमध्ये एक सुवर्ण पदक पटकावले. (Sahil Jadhav and Chikhita Thaniparthi won gold)

मिश्र कंपाउंडमधील भारताचा दक्षिण कोरियाबरोबरचा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला. अंतिम सामन्यात चार सेटमध्ये दोन्ही संघाचे गुण १५७-१५७ असा बरोबरीत राहिला. त्यानंतर निकाल शुटआऊटमध्ये झाला. त्यामध्ये भारताने बाजी मारत साहिल जाधव आणि चिखित थानिप्रथीने सुवर्णपदकावर नाव कोरले. (Sahil Jadhav and Chikhita Thaniparthi won gold)

महिला कपाउंड तिरंदाजी प्रकारात भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकावले. त्यांनी चीन संघावर २३८-२३४ अशा गुणांनी मारत केली. चिकिता तनिपार्थी, पृथिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम यांचा संघात समावेश होता. अंतिम सामन्यात पृथिका आणि ज्योती यांनी एकही नेम चुकला नाही. भारतीय महिला संघने २३८ गुणांची कमाई करत जागतिक विक्रमाची बरोबरी केली. हा विक्रम दक्षिण कोरियाच्या नावावर होता. अंतिम फेरीत भारतीय त्रिकुटाने सलग परफेक्ट १० गुण मिळवत पहिला राऊंड ६०-५८ अशा गुणांनी जिंकला. दुसरा सेटही भारताने ६०-५८ गुणांनी जिंकला. अंतिम राऊंडमध्ये चीनच्या खेळाडूंवर दबाव आला. त्यांनी दोनदा ९ गुण मिळवले तर भारताने सहाही शॉटमध्ये परफेक्ट १० गुण मिळवले. (Sahil Jadhav and Chikhita Thaniparthi won gold)

Related posts

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाणार :  अभिजीत दिपकें

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव