ठाकरे गटाचे थरवळ शिंदे गटात

मुंबई  : विशेष प्रतिनिधी :  विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना डोंबिवलीतील उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाने या ठिकाणी दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज होते. (Sadanand Tharval)

सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते  ठाकरे यांच्यासमवेत होते. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. सोमवारी संध्याकाळी शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ