बरेली : संभलचे जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका यांनी शहरातील १९ प्राचीन विहिरींसह ६८ तीर्थक्षेत्रांचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यामध्ये ‘मृत्यू कूप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीच्या पुनरुत्थानाचाही समावेश आहे. (Sambhal)
‘मृत्यू कूप’ विहिरीभोवती बऱ्याच प्रमाणात अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण हटवून विहिरीच्या उत्खननास गुरुवारी सुरुवात करण्यात आली. मुघलकालीन जामा मशिदीपासून अवघ्या २५० मीटर अंतरावर हे उत्खनन सुरू आहे. संभल तीर्थक्षेत्राच्या प्रदक्षिणेविषयीच्या पुस्तकामध्ये या मृत्यू कूपाचे वर्णन आहे. पद्मश्री सन्मानप्राप्त लेखक डॉ. रमाकांत शुक्ला यांनी १९८५ मध्ये हे पुस्तक लिहिले आहे. संभल नगरपालिकेमधील दक्षिणेकडील वॉर्ड क्र. १४ मध्ये कोट पूर्वी भागात हे ठिकाण आहे. गुरुवारी नगरपालिकेचे कर्मचारी आणि भाजपचे नगरसेवक गगन वर्षनी हे उत्खननस्थळी पोहोचले. संभलमहात्म्य या पुरातन ग्रंथामध्येही या विहिरीचा उल्लेख आहे.
मृत्यू कूप ही हजारो पापे नष्ट करू शकते. या विहिरीमध्ये स्नान केल्यामुळे भगवान शिव आनंदित होतात, असा प्राचीन ग्रंथात उल्लेख आहे. मृत्यू कूपच्या उत्तरेस विमलकूप ही विहीर असून दक्षिणेस १५० यार्ड अंतरावर यमगिनी कूप ही विहीर आहे. “जिल्हा प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकार हे सत् युगातील प्राचीन वारसा पुनरुज्जीवित करत आहेत. यामध्ये ६८ तीर्थक्षेत्रांचे पुनरुत्थान करण्यात येईल. माझ्या वॉर्डातील काही विहिरी यासाठी निश्चित करण्यात आल्या असून त्यावर काम सुरू झाले आहे,” असे वर्षनी यांनी सांगितले. (Sambhal)
हेही वाचा :