हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करा

कोल्हापूर; प्रतिनिधी : केंद्रात ज्या विचारांचे सरकार आहे त्याच विचारात सरकार राज्यात असेल तर सर्वसामान्यांसाठी विविध योजना आणण्यासाठी त्याचा फायदा होतो. ज्या पद्धतीने हरियाणाच्या लोकांनी विचारपूर्वक सरकार निवडले त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेनेही, असा निर्णय घ्यावा आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.  (Ajit Pawar )

 येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अंमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजीत कदम, भाजपचे विजय जाधव, महेश जाधव, डॉ. सदानंद राजवर्धन आदींसह महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे, विमान वाहतूक यांसारखे खूप मोठे प्रकल्प आणि विकासाच्या योजना महाराष्ट्राला दिल्या आहेत. आज त्यामधील काही प्रकल्पांचे उदघाटनही झाले. आम्ही राज्य सरकार म्हणून शेतकरी, महिला, युवक आणि गरिबांसाठी विविध योजना सुरू केल्या. पण विरोधी पक्षांनी लाडकी बहीण आणि शेतकरी, युवक यांच्यासाठी ज्या योजना महायुती सरकारने सुरू केल्या आहेत त्या सत्तेवर आल्यावर बंद करू, असे आत्ताच जाहीर केले आहे. त्यामुळे या योजना सुरू ठेवण्यासाठी तुम्ही महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या. हसन मुश्रीफ महायुतीमध्ये मंत्री असल्यामुळे ते हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजच्या सुविधांसह अनेक प्रकल्प पूर्ण करू शकले आहेत. (Ajit Pawar )

पवार म्हणाले, अनेक दशके, अनेक वर्षे प्रत्येक पंतप्रधानांकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा अशी मागणी केली जात होती. पण त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेत मराठी भाषेला अभिजात दर्जा देवून मराठी भाषेचा गौरव केला. यापुढे ३ ऑक्टोबर हा दिवस मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा केला जाईल. यावेळी पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आता शेंडा पार्क येथे विविध सुविधांसह उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलची माहिती दिली.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी