Raut attack Gorhe  : ज्या सोन्याच्या ताटात खाल्लं, त्यातच घाण करुन गेल्या…

Raut attack Gorhe

Raut attack Gorhe

मुंबई : प्रतिनिधी : ज्या घरात खाल्लं, ज्या सोन्याच्या ताटात खाल्लंत, ज्यांच्यामुळे आमदार झालात तिथेच घाण करुन गेल्या, अशा शब्दात शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली.(Raut attack Gorhe)

नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमातील मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी ‘उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिटीज दिल्या की एक पद मिळायचे’, अशी टीका केली होती. गोऱ्हे यांच्या टीकेचा खासदार राऊत यांनी सोमवारी चांगलाच समाचार घेतला. राऊत यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनाही फटकारले आहे.(Raut attack Gorhe)

नीलम गोऱ्हे यांच्या टीकेवर संजय राऊत म्हणाले, “ज्या घरात खाल्लं, ज्या सोन्याच्या ताटात खाल्लंत, ज्यांच्यामुळे आमदार झालात तिथेच घाण करून गेल्या. शिवसेनेत आल्यावर त्या चार वेळा आमदार झाल्या. जाताना ताटात घाण करून गेल्या..” पुणे शहराचे प्लॅनिंग सुरू होते तेव्हा या बाईंनी कोट्यवधी रुपये गोळा केल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेची उमेदवारी घेण्यासाठी नाशिकच्या माजी महापौर विनायक पांडे यांच्याकडे पैसे घेतले होते,’’ असा आरोपही खासदार राऊत यांनी केला. (Raut attack Gorhe)

खासदार राऊत म्हणाले  “तुम्ही पक्ष सोडून गेलात, पण एक संस्कार-संस्कृती असते. पण गेल्यानंतर तुम्ही मातोश्रीबाबतीत, शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत अशी विधाने करता. त्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला चार वेळा आमदार केले. उपसभापती केले, म्हणून तुमचा रुबाब आहे.” (Raut attack Gorhe)

नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केल्यानंतर तुमच्यावर हक्कभंगाची कारवाई होऊ शकते असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, ”माझ्यावर दहा हक्कभंग आणा. मी नीलम गोऱ्हे या व्यक्तीवर बोललो आहे. उपसभापतींवर बोललो नाही. महाराष्ट्राने गोऱ्हे यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे  त्या विश्वासघातकी आहेत. आम्ही तुरुंगात जाऊन आलो आहे, ईडी, सीबीआयनेही कारवाई केली आहे. हक्कभंग झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा :

 महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी उचलले भयंकर पाऊल

Related posts

India’s major decisions

India’s major decisions: सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद

Shivaji enter semi final

Shivaji enter semi final : शिवाजी तरुण मंडळ उपांत्य फेरीत

Luxury Goods

Luxury Goods : महागड्या वस्तू घेताय?… १% टीसीएस लागू