दिल्ली : प्रतिनिधी : महाराष्ट्रात भाजप महायुतीने सणासुदीच्या काळात रेशनवर ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप केले त्याप्रमाणे भाजपकडूनही रमजान ईदनिमित्त देशभरातील ३२ लाख मुस्लीमांना स्पेशल किट चे वाटप केले जाणार आहे. ‘सौगात-ए-मोदी’ असे किटला नाव देण्यात आले आहे. (Ramjan kit)
भाजपने मंगळवारी ‘सौगात-ए-मोदी’ अभियानास सुरुवात केली. या अभियानाअंतर्गत देशभरातील ३२ लाख वंचित मुसलमानांना ईद साजरी करण्यासाठी हे विशेष किट दिले जाणार आहे. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने या अभियानाची जबाबदारी घेतली. प्रत्येक मशिदीत १०० लोकांना ही मदत पोहोचवण्याचे टार्गेट दिले आहे. (Ramjan kit)
‘सौगात-ए-मोदी’ या किटमध्ये कपडे आणि खाण्याचे साहित्य आहे. त्यामध्ये महिलांसाठी सूट, पुरुषांसाठी कुर्ता पायजमा, डाळ, तांदूळ, शेवया, मोहरीचे तेल, साखर, मेवा, खजूर या पदार्थांचा समावेश आहे. प्रत्येक किटची किंमत ५०० ते ६०० रुपये आहे. (Ramjan kit)
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकींनी सांगितले की “ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रत्येक सणात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. आज आम्ही ‘सौगात-ए-मोदी’ किट वाटत आहोत. कारण हा रमजान चा महिना आहे. प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे. जिल्हास्तरावर ईद मिलन समारंभ आयोजित केला जाणार आहे”. (Ramjan kit)
अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय मिडिया प्रभारी यासिर जिलानीने म्हटले आहे की “हे अभियान मुस्लीम समुदायासाठी कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी केला जाणार आहे. या अभियानाने भाजप आणि एनडीएसाठी पाठिंबा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे”. (Ramjan kit)
भाजपचे नेते मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, “नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा कधीही मतांसाठी नव्हता. गेल्या अकरा वर्षात समाजातील तळातील लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचे काम मोदींनी केले आहे”.
भाजपच्या या अभियानाबद्दल विरोधी पक्षांनी हे राजकारणातील हृदय परिवर्तन आहे अशी टीका केली आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, “भाजप आणि त्यांच्या लोकांनी प्रत्येक सण साजरा केला पाहिजे. समाजवादी म्हणने आहे की सर्व सण उत्साहाने साजरे केले पाहिजेत. मग तो कोणत्याची धर्माचा असो. भाजप मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करत आहे याचा मला आनंद झाला आहे. भाजप एक अशी पार्टी आहे की जी एका मतासाठी काहीही करु शकते”. (Ramjan kit)
हेही वाचा :
रान्याने हवालाद्वारे पैसे पाठवले