Rakesh Kumar Sharma : मानवी मेंदूचे तंत्रज्ञान सर्वात प्रगत : कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा

Rakesh Kumar Sharma

कोल्हापूर : प्रतिनिधी : नवतंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच उत्तम कौशल्ये आत्मसात  करणे अत्यावश्यक आहे. मानवी मेंदू एवढे प्रगत तंत्रज्ञान कोणतेही नाही. त्यामुळे स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून नव संशोधन व विविध कौशल्ये आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडेल असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केले. डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या ‘दीक्षारंभ’ स्वागत समारंभात ते बोलत होते. (Rakesh Kumar Sharma)

डी. वाय. पाटील  अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचा ‘दीक्षारंभ’ बुधवारी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, परीक्षा नियंत्रक प्रा.  अभय जोशी, डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक प्रा. डॉ. अजित पाटील, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक अभिजीत मटकर,  डेप्युटी रजिस्ट्रार प्रा. अश्विन देसाई आदी व्यासपीठावर  उपस्थिती होते. यावेळी ९८.५५ पर्सेंटाईल मिळवून डाटा सायन्सला प्रवेश घेणाऱ्या सिद्धी राजपूत हिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. (Rakesh Kumar Sharma)

यावेळी डॉ. शर्मा म्हणाले, कुलपती  डॉ. संजय डी. पाटील यांनी  नेहमीच विद्यार्थ्याना चांगल्या सुविधा आणि सर्वोत्तम शिक्षण देण्यावर भर दिला आहे. विद्यार्थी हीच  खरी संपत्ती असून  त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे काम संस्था करत आहे. आजच्या स्पर्धात्मक जगाची गरज लक्षात  घेऊन विद्यार्थ्यांना बहुशाखीय शिक्षण,  गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते.  विद्यार्थ्यानी केवळ कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता स्वतःच्या बुद्धीचा योग्य वापर करून प्रगती साधणे गरजेचे आहे.

प्रास्ताविक प्रा. डॉ. अजित पाटील यांनी केले. कार्यकारी संचालक डॉ. ए के गुप्ता म्हणाले यांनी मार्गदर्शन केले.  कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले यांनी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना आणि विस्तार याची माहिती दिली. 

यावेळी प्रा. डॉ. अजित पाटील यांनी सादरीकरणाद्वारे संस्थेच्या कार्याचा व महाविद्यालयाच्या शैक्षणिक नियोजनाचा आढावा मांडला.  संस्थेला नॅक ‘ए प्लस प्लस’, एनआरएफ १५० रँक आणि क्यूएस आय-गेज कडून डायमंड मानांकन मिळाले आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामजस्य करार करण्यात आले आहेत.  उद्योगजगतातील तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात असून अनुभव व प्रयोगात्मक शिक्षणावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले.  (Rakesh Kumar Sharma)

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपच्या सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, डॉ. अद्वैत राठोड, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, डॉ. उमराणी जे, डॉ. अमृतकुंवर रायजादे, डॉ. मारुती देवकर, रुधीर बारदेस्कर, महाविद्यालय विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी यांच्यासह बाराशेहून अधिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. मारुती देवकर यांनी केले तर आभार अभिजीत मटकर यांनी मानले.

Related posts

फडणवीसांचे चॅलेंज सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदेंनी स्वीकारले

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर

सरकारने एफआयआर घ्यायला का नकार दिला?;  सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना  सवाल