Home » Blog » देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या हिमंतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत

देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या हिमंतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray's criticism of Fadnavis

मुंबई : प्रतिनिधी : देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या हिमंतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत. त्यांना बसवलेले आहे, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सांगतेच्या दिवशीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरेंनी न्यूज १८ मराठी दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी फडणीसांवर टीका केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान हे स्वत:च्या हिंमतीवर मुख्यमंत्री झाले आहेत असे सांगून राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तसे मिळाले नसल्याचे सांगितले. २०१४ मध्ये फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. आणि फडणवीसांना उप मुख्यमंत्रीपद केले. त्यांनी ते स्वीकारले. आधी मुख्यमंत्री झाले त्यानंतर उप मुख्यमंत्री केलं गेले. जर एका बसलेला माणूस असता त्यांनी त्यांनी ठाम नकरा दिला असता. बसलेला आणि बसवलेला यात फरक असतो असेही ठाकरे म्हणाले. (Municipal elections, Raj Thackeray, CM Fadnavis)

हिंदूत्वाच्या बुरख्याखालून लढू नका असेही राज ठाकरे म्हणाले. हिंदूत्वाच्या नावाखाली मराठीपण घालवू नका असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला. हिंदूत्वाच्या बुरख्याला लढून तुमचं काय चालले आहे हे आम्हाला माहीत आहे. मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जातात हे हिंदूत्वाच्या नावाखाली जातात का? असा सवालही त्यांनी केला. बुलेट ट्रेन अजिबात व्हायला नको. पावनेदोन लाख कोटीपर्यंत आपण जपानकडून कर्ज घेतले आहे. तीन हजार रुपये तिकीट आणि अमुक फेऱ्या ठेवल्याशिवाय ते परवडू शकत नाही. लांबच्या पल्ला असेल त्या ठिकाणी बुलेट ट्रेन आणायची असते. मुंबई ते अहमदाबाला किती ट्रेन जातात असा सवाल करत सध्या सुरू असलेल्या ४० ते ५० टक्के ट्रेन रिकाम्या जातात. त्यामुळे बुलेट ट्रेन आणून काहीही होणार नसल्याचे सांगितले. (Municipal elections, Raj Thackeray, CM Fadnavis)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00