बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकी श्री रामजन्मभूमी मंदिरातील दानपेटीच्या चढावा मोजणीत झालेल्या अनियतिमततेच्या घटनेवर खेद व्यक्त करण्यात आला. बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय जी होसबाळे यांच्यासह २२६ कार्यकर्ते उपस्थित होते. (Discussion regarding the theft of donations at an RSS meeting.)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीची सांगता बेळगावात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय जी होसबाळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला देशातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री रामजन्मभूमी मंदिरात दानपेटीच्या चढावा मोजणीत (अर्पणाच्या मोजणीत) झालेल्या अनियमिततेच्या घटनेवर खेद व्यक्त करण्यात आला.
पोलिसांची कारवाई निर्णायक टप्प्यावर पोहोचेल
बैठकीत श्री रामजन्मभूमी मंदिरात दानपेटीच्या चढावा मोजणीत (अर्पणाच्या मोजणीत) झालेल्या अनियमिततेच्या घटनेवर खेद व्यक्त करण्यात आला., तसेच तीर्थक्षेत्र न्यासाच्या निवेदनावरून सुरू असलेली एसआयटी आणि पोलिसांची कारवाई निर्णायक टप्प्यावर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. तीर्थक्षेत्र न्यासाकडून ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली की, भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये ज्यामुळे समस्त रामभक्तांच्या राममंदिराबद्दलच्या श्रद्धेला आणि आस्थेला धक्का बसेल, याची त्यांनी खात्री करावी असे आवाहन बैठकीत करण्यात आले. ( (Discussion regarding the theft of donations at an RSS meeting.)
सामाजिक कार्य, पंच परिवर्तन विषयांत लोकांना सक्रीय करणार
बैठकीत मार्च २०२६ नंतर संघाच्या विविध स्तरांवर संपन्न झालेल्या प्रशिक्षण वर्गांचा आढावा घेण्यात आला.शाखांच्या स्तरावर कार्ययोजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक शाखा विस्तार योजनेवरही चर्चा झाली. शताब्दी वर्षाच्या संपन्न झालेल्या कार्यक्रमांचा आढावा आणि उर्वरित नियोजित कार्यक्रमांच्या योजनेवरही विचार करण्यात आला. शताब्दी वर्षाच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या लोकांना सामाजिक कार्य आणि पंच परिवर्तन या विषयांमध्ये सक्रिय करण्याच्या योजनेवर विचार विनिमय झाला. सरसंघचालकांच्या वर्ष २०२६-२७ च्या प्रवास योजनेवरही चर्चा करण्यात आली.
ड्रग्जच्या वाढत्या दुष्परिणामाबद्दल चिंता
बैठकीत सद्य परिस्थितीतील विविध विषयांवर चर्चा झाली, ज्यामध्ये मुख्यत्वे जनगणनेच्या संदर्भातील माहिती आणि जनसांख्यिकी असंतुलनामुळे निर्माण झालेली आव्हाने इत्यादी विषयांचा समावेश होता. ड्रग्जच्या वाढत्या दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त करण्यासोबतच, नशामुक्तीसाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर आणि संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५० व्या जन्मजयंती वर्षाच्या कार्यक्रमांच्या नियोजनावरही चर्चा झाली. (Discussion regarding the theft of donations at an RSS meeting.)