Home » Blog » सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर ?

सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर ?

by प्रतिनिधी
0 comments
Sunita Pawar's appointment is illegal

जमीर काझी : मुंबई : अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांच्या पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. त्यांच्या अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे.

पक्षाचे माजी  राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांची  नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आक्षेप घेत थेट वकिलांमार्फत  त्यांना नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनाही वादी करीत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड रद्द करून नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Sunita Pawar’s appointment is illegal)

पक्षातील नेत्यानेच नोटीस पाठवल्याने खळबळ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. त्याचे गूढ कायम असून हा घातपात असल्याचा संशय आजही मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जात आहे . त्याचवेळी पक्षात अनेक बदल करण्यात आले. निधनानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले. त्याचे चिरंजीव पार्थ पवार हे राज्यसभेवर गेले. त्यांनी पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याने   पक्षातीलच  ज्येष्ठ नेते दुखावले आहेत. त्यामुळे पक्षात कुरबुरी सुरू असून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करून पक्षाची सर्व सूत्रे आपल्याच हाती कसे असतील, यासाठी सर्व सोपस्कार पार पडले. परंतु आता थेट पक्षातूनच सुनेत्रा पवार यांना आता उघड आव्हान मिळाले आहे. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्षपद आता धोक्यात येते की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. पक्षातीलच नेत्याने त्यांना नोटीस पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सच्चिदानंद सिंह यांवा दावा कशाच्या आधारावर?

दरम्यान, अजितदादा यांचे निधन होऊन अद्याप वर्ष लोटलेले नाही. तरीदेखील राष्ट्रवादी पक्षात पवार कुटुंबाला अंतर्गत आव्हान मिळत आहे. सच्चिदानंद सिंह यांनी यांनी राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक ही अवैध आहे, असा खळबळजनक दावा केला आहे. २६ फेब्रुवारीची निवड अवैध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सच्चिदानंद सिंह यांनी हा दावा नेमका कोणत्या आधारावर केला? हे अद्याप समोर आलेले नाही. (Sunita Pawar’s appointment is illegal)

प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया

नोटीशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या नोटीसशी माझा कुठलाहा संबध नाही. या नोटीसला फार महत्व देण्याचा कुठलेही कारण नाही. सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाच्या घटनेला धरुन झालेली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरुन काढणे गरजेचे आहे.

कोण आहेत सच्चिदानंद सिंह…

. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर सच्चिदानंद सिंह हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत राहिले होते. तसेच पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार यांना मिळावं यासाठी पडद्याआडून हालचाली करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. ते पक्षाची माजी सचिव राहिले आहेत. ते महाराष्ट्रात सक्रीय नसले तरी पक्षाच्या दिल्लीतील आणि इतर राज्यांमधील ते भूमिका बजावत असतात. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आलेल्या कार्यकारिणीत सिंह यांचा समावेश नाही. (Sunita Pawar’s appointment is illegal)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00