Home » Blog » Kishore Kadam : जगाच्या नकाशावर कोल्हापूर शहराची ओळख ‘कान्स’ सारखी व्हावी  

Kishore Kadam : जगाच्या नकाशावर कोल्हापूर शहराची ओळख ‘कान्स’ सारखी व्हावी  

by प्रतिनिधी
0 comments
Kishore Kadam

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला चित्रपटाची मोठी परंपरा आहे. चित्रनगरीत अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चित्रपटक्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञानाची मदत घेऊन राजकीय नेतृत्वाने सांस्कृतिक व्यवस्थेचा विस्तार कसा होईल हे पाहिले पाहिजे. कोल्हापूर चित्रनगरीच्या माध्यमातून जगप्रसिद्ध चित्रपट महोत्सव नगरी म्हणून ओळखलेल्या कान्स शहरासारखी कोल्हापूर शहराची ओळख जगाच्या नकाशावर ठळकपणे व्हावी, असे मत कवी, अभिनेते, गीतकार किशोर कदम यांनी व्यक्त केले. (Kishore Kadam)

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ आयोजित ‘चित्रनगरी : कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार’ या चर्चासत्रात ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अशिष शेलार यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. चर्चासत्रात अभिनेते किशोर कदम, अभिनेते सागर तळाशीकर, दूरचित्रवाणी तज्ज्ञ डॉ. उदय नारकर, चित्रपट अभ्यासक डॉ. कविता गागराणी, दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

मंत्री अशिष शेलार म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीमध्ये पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी दिला आहे. या निधीतून चित्रनगरीतरस्ता, वाडा, मंदिर, विश्रामगृह आणि तंत्रज्ञानासाठीचं कार्यालय असेल. उपलब्ध केलेल्या सुविधांचा  उपयोग करून जास्तीत जास्त चित्रीकरण, चित्रपट निर्मिती आणि कंटेंट क्रिएशन  झाले पाहिजे.  कोल्हापूरचे कलाकार, चित्रपट निर्मितीसंबधीत व्यक्ती आणि रसिक यांना समाविष्ट करण्यासाठी कोर्सेस आणि त्याबद्दलची पूर्ण पार्श्वभूमीची योजना करण्यासाठी आम्ही काम करत असून त्यासाठी १५ कोटींचा अधिक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. (Kishore Kadam)

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिभीषण चवरे यांनी चित्रनगरीतील विकास कामांची माहिती देऊन कोल्हापूर चित्रनगरी सर्जनशील व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चित्रनगरीत सध्या २००जणांना आर्थिक रोजगार उपलब्ध झाला असून येथे विविध विकास कामे सुरू असल्याचे चवरे यांनी सांगितले.

अभिनेते किशोर कदम यांनी कोल्हापूरची चित्रपट परंपरा मोठी असून राजकीय नेतृत्वाच्या मदतीने चित्रनगरी विस्तार होण्यासाठी पावले उचलली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. चित्रपट कलावंत आणि तंत्रज्ञांच्या मागणीनुसार सेटस् ची उभारणी केली पाहिजे. तसेच ७५ एकर जागेवर ज्या मोकळ्या जागा आहेत तिथे बदलत्या परिस्थितीनुसार सेटस् उभारण्यासाठी जागा मोकळ्या ठेवण्याची सूचना केली. कोल्हापूर शहराची चित्रपरंपरा आणि बदलत्या चित्रपटसृष्टीचे महत्व लक्षात घेऊन इथे चित्रपटसृष्टीला पायाभूत असणाऱ्या सुविधा निर्माण करुन इथे उत्तम चित्रपट निर्माण करावेत. चित्रपट निर्मिती पूरक असणारी प्रशिक्षण संस्था उभारावी. सिनेमा कसा पहावा यासारखे शिक्षण या संस्थामध्ये दिले पाहिजे.

आपण इतिहासात किती काळ रमणार आहे असा प्रश्न उपस्थित करुन अभिनेते सागर तळाशीकर यांनी वर्तमानात कोल्हापूर चित्रपटनगरीत कोणत्या नवीन संकल्पना राबवायल्या हव्यात यावर लक्ष ठेवले पाहिजे असे मत व्यक्त केले. चित्रनगरी हे पर्यटन स्थळ बनावे हा मुख्य हेतू नसता कामा नये असे मत व्यक्त करुन चित्रपट निर्मिती ही चित्रनगरीची मुख्य प्राथमिकता असली पाहिजे यावर त्यांनी जोर दिला. वेगवेगळे आणि मोठ्या आकाराचे फ्लोअर्सची निर्मिती झाली पाहिजे. मुंबईप्रमाणे स्थानिक कलाकारांना मानधन दिले पाहिजे यासाठी यंत्रणा उभी राहिली पाहिजे. चित्रनगरीच्या माध्यमातून कोल्हापूरचा सुवर्णकाळ निर्माण करण्यासाठी राजकीय, प्रशासकीय आणि कलाकारांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

चित्रपट अभ्यासक डॉ.कविता गागराणी यांनी कोल्हापूर चित्रपटसृष्टी इतिहास उलगडून दाखवला. चित्रपटासाठी पहिला कॅमेरा कोल्हापूरात निर्माण झाला. कोल्हापूरात निर्माण झालेल्या किचकवधाच्या दृश्यावर भारतातील पहिला सेस्नॉर आला होता. सावकारी पाश हा सामाजिक विषयावरील देशातील पहिल्या चित्रपट निर्मितीची सुरुवात कोल्हापुरात झाली होती. चित्रपट निर्मितीसाठी येणाऱ्या सर्व संकटावर मात करुन बाबूराव पेंटर यांनी चित्रपट निर्माण केला होता. लोकमान्य टिळकांनी त्यांना सिनेमा केसरीने गौरवलेले होते अशी माहिती डॉ.गागराणी यांनी दिले. कोल्हापूर संस्थानाच्या छत्रपती राजाराम महाराज आणि आक्कासाहेब राणीसाहेबांनी चित्रपट निर्मितीसाठी दोन स्टुडिओ निर्माण केले. या दोन स्टुडियोमधून मराठी बरोबर हिंदी चित्रपटांची निर्मिती झली. ही कोल्हापूरची परंपरा भविष्यातील पिढीला माहिती व्हावी यासाठी चित्रपटनगरीत म्युझियमरुपाने भावी पिढीच्या माहितीसाठी मांडावी अशी सूचना मांडली. (Kishore Kadam)

चित्रनगरीत फ्लोअर आणि सेटस् उभारताना आर्ट डायरेक्टरांची नियुक्ती करावी अशी सूचना  दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी केली. राज्य सरकारने चित्रपट प्रदर्शनासाठी नवीन चॅनेल सुरू करावे, चित्रपट तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण केंद्र उभारावे, कायमस्वरुपी भव्य क्रोमा सेट उभारावा अशा सूचना केल्या.

अध्यक्षीय भाषणात दूरचित्रवाणी तज्ज्ञ डॉ. उदय नारकर यांनी चित्रनगरी ही कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा विषय असून ती पूर्णत्वास नेली पाहिजे. कोल्हापूरने चित्रपटसृष्टीला दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते दिले. आजही कोल्हापूरची माती कलाकारांची असून स्थानिक कथानकांवर दर्जदार चित्रपटाची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया असे आवाहन केले. चित्रनगरीतील मोकळ्या जागा ठेवा. तिथे नवीन पिढी नवीन कालानुरुप नवीन सेटस् आणि फ्लोअरची उभारेल. नवनिर्मिती आणि मानवी भावनांशी संबधित विषयाची निर्मिती व्हावी यासाठी निकोप स्पर्धा अशी भावना व्यक्त केली. चांगल्या निर्मितीसाठी उपजत द्रष्टेपण आवश्यक असते. ते या कोल्हापूरच्या मातीत आहे. चित्रपट विषयक जागतिक तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध व्हावे. यासाठी शासनाने आवश्यक ते सर्व पाठबळ द्यावे, असे मत उदय नारकर यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विनोद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.(Kishore Kadam)

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ आयोजित ‘चित्रनगरी : कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार’ या चर्चासत्रात ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अशिष शेलार यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. चर्चासत्रात अभिनेते किशोर कदम, अभिनेते सागर तळाशीकर, दूरचित्रवाणी तज्ज्ञ डॉ. उदय नारकर, चित्रपट अभ्यासक डॉ. कविता गागराणी, दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

मंत्री अशिष शेलार म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीमध्ये पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी दिला आहे. या निधीतून चित्रनगरीतरस्ता, वाडा, मंदिर, विश्रामगृह आणि तंत्रज्ञानासाठीचं कार्यालय असेल. उपलब्ध केलेल्या सुविधांचा  उपयोग करून जास्तीत जास्त चित्रीकरण, चित्रपट निर्मिती आणि कंटेंट क्रिएशन  झाले पाहिजे.  कोल्हापूरचे कलाकार, चित्रपट निर्मितीसंबधीत व्यक्ती आणि रसिक यांना समाविष्ट करण्यासाठी कोर्सेस आणि त्याबद्दलची पूर्ण पार्श्वभूमीची योजना करण्यासाठी आम्ही काम करत असून त्यासाठी १५ कोटींचा अधिक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. (Kishore Kadam)

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिभीषण चवरे यांनी चित्रनगरीतील विकास कामांची माहिती देऊन कोल्हापूर चित्रनगरी सर्जनशील व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चित्रनगरीत सध्या २००जणांना आर्थिक रोजगार उपलब्ध झाला असून येथे विविध विकास कामे सुरू असल्याचे चवरे यांनी सांगितले.

अभिनेते किशोर कदम यांनी कोल्हापूरची चित्रपट परंपरा मोठी असून राजकीय नेतृत्वाच्या मदतीने चित्रनगरी विस्तार होण्यासाठी पावले उचलली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. चित्रपट कलावंत आणि तंत्रज्ञांच्या मागणीनुसार सेटस् ची उभारणी केली पाहिजे. तसेच ७५ एकर जागेवर ज्या मोकळ्या जागा आहेत तिथे बदलत्या परिस्थितीनुसार सेटस् उभारण्यासाठी जागा मोकळ्या ठेवण्याची सूचना केली. कोल्हापूर शहराची चित्रपरंपरा आणि बदलत्या चित्रपटसृष्टीचे महत्व लक्षात घेऊन इथे चित्रपटसृष्टीला पायाभूत असणाऱ्या सुविधा निर्माण करुन इथे उत्तम चित्रपट निर्माण करावेत. चित्रपट निर्मिती पूरक असणारी प्रशिक्षण संस्था उभारावी. सिनेमा कसा पहावा यासारखे शिक्षण या संस्थामध्ये दिले पाहिजे.

आपण इतिहासात किती काळ रमणार आहे असा प्रश्न उपस्थित करुन अभिनेते सागर तळाशीकर यांनी वर्तमानात कोल्हापूर चित्रपटनगरीत कोणत्या नवीन संकल्पना राबवायल्या हव्यात यावर लक्ष ठेवले पाहिजे असे मत व्यक्त केले. चित्रनगरी हे पर्यटन स्थळ बनावे हा मुख्य हेतू नसता कामा नये असे मत व्यक्त करुन चित्रपट निर्मिती ही चित्रनगरीची मुख्य प्राथमिकता असली पाहिजे यावर त्यांनी जोर दिला. वेगवेगळे आणि मोठ्या आकाराचे फ्लोअर्सची निर्मिती झाली पाहिजे. मुंबईप्रमाणे स्थानिक कलाकारांना मानधन दिले पाहिजे यासाठी यंत्रणा उभी राहिली पाहिजे. चित्रनगरीच्या माध्यमातून कोल्हापूरचा सुवर्णकाळ निर्माण करण्यासाठी राजकीय, प्रशासकीय आणि कलाकारांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

चित्रपट अभ्यासक डॉ.कविता गागराणी यांनी कोल्हापूर चित्रपटसृष्टी इतिहास उलगडून दाखवला. चित्रपटासाठी पहिला कॅमेरा कोल्हापूरात निर्माण झाला. कोल्हापूरात निर्माण झालेल्या किचकवधाच्या दृश्यावर भारतातील पहिला सेस्नॉर आला होता. सावकारी पाश हा सामाजिक विषयावरील देशातील पहिल्या चित्रपट निर्मितीची सुरुवात कोल्हापुरात झाली होती. चित्रपट निर्मितीसाठी येणाऱ्या सर्व संकटावर मात करुन बाबूराव पेंटर यांनी चित्रपट निर्माण केला होता. लोकमान्य टिळकांनी त्यांना सिनेमा केसरीने गौरवलेले होते अशी माहिती डॉ.गागराणी यांनी दिले. कोल्हापूर संस्थानाच्या छत्रपती राजाराम महाराज आणि आक्कासाहेब राणीसाहेबांनी चित्रपट निर्मितीसाठी दोन स्टुडिओ निर्माण केले. या दोन स्टुडियोमधून मराठी बरोबर हिंदी चित्रपटांची निर्मिती झली. ही कोल्हापूरची परंपरा भविष्यातील पिढीला माहिती व्हावी यासाठी चित्रपटनगरीत म्युझियमरुपाने भावी पिढीच्या माहितीसाठी मांडावी अशी सूचना मांडली. (Kishore Kadam)

चित्रनगरीत फ्लोअर आणि सेटस् उभारताना आर्ट डायरेक्टरांची नियुक्ती करावी अशी सूचना  दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी केली. राज्य सरकारने चित्रपट प्रदर्शनासाठी नवीन चॅनेल सुरू करावे, चित्रपट तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण केंद्र उभारावे, कायमस्वरुपी भव्य क्रोमा सेट उभारावा अशा सूचना केल्या.

अध्यक्षीय भाषणात दूरचित्रवाणी तज्ज्ञ डॉ. उदय नारकर यांनी चित्रनगरी ही कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा विषय असून ती पूर्णत्वास नेली पाहिजे. कोल्हापूरने चित्रपटसृष्टीला दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते दिले. आजही कोल्हापूरची माती कलाकारांची असून स्थानिक कथानकांवर दर्जदार चित्रपटाची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया असे आवाहन केले. चित्रनगरीतील मोकळ्या जागा ठेवा. तिथे नवीन पिढी नवीन कालानुरुप नवीन सेटस् आणि फ्लोअरची उभारेल. नवनिर्मिती आणि मानवी भावनांशी संबधित विषयाची निर्मिती व्हावी यासाठी निकोप स्पर्धा अशी भावना व्यक्त केली. चांगल्या निर्मितीसाठी उपजत द्रष्टेपण आवश्यक असते. ते या कोल्हापूरच्या मातीत आहे. चित्रपट विषयक जागतिक तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध व्हावे. यासाठी शासनाने आवश्यक ते सर्व पाठबळ द्यावे, असे मत उदय नारकर यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विनोद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00