राहुल गांधींची उचगावातील दलित कुटुंबास अचानक भेट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज (दि.५) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधी यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत केले. कोल्हापूर विमानतळावरून ते थेट उचगाव चौकातील अजित संधे यांच्या कौलारू घराला भेट दिली. त्या घरी अर्धा तास थांबले, त्यांच्याशी संवाद साधला.घरगुती नाश्ता केला. त्यानंतर त्यांनी कुटुंबाकडे संविधानाची प्रत सुपुर्द केली.आणि तिथून बाहेर पडले. त्यानंतर कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण आज (दि. ५) राहुल गांधी यांच्या हस्ते झाले.

कोण आहेत संधे कुटुंबीय…

उचगावातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अजित तुकाराम संधे यांचे कुटुंब रहायला आहे. अजित टेम्पोचालक असून सर्वसामान्य गरीब कुटुंब आहे. या भेटीनंतर काँग्रेस आमदार विश्वजित कदम म्हणाले, गांधी कुटुंबाचा डीएनए गोरगरिब कुटुंबासोबत राहणं, सर्वसामान्य लोकांत मिसळणं, त्यांच्या सुखदुख:त सहभागी होणं हे आहे. गांधी कुटुंबाची ही परंपरा राहुल गांधी जोपासताना दिसत आहेत. कोल्हापूर शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील लोकांशी संवाद साधत त्यांचं जीवनमान समजून घेण्यासाठी आले होते ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे, असं ते म्हणाले. राहुल गांधींनी गरीब कुटुंबाची भेट घेतल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा  :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली