नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी गुरुवारी (१८ सप्टेंबर) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘मी लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून मी हे जबाबदारीने बोलत आहे. या देशात मतदानात कसा गोंधळ घातला जात आहे. हे तरुणांना समजावून सांगण्यासाठी आणखी एक बाजू समजावून घ्यावी लागेल. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तच लोकशाहीच्या मारेकऱ्यांचे संरक्षण करत आहेत, लोकशाही नष्ट करत आहेत,’’, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. (Rahul alleges ECI)
“मी भारतातील तरुणांना सांगू इच्छितो की, ते लोकशाहीच्या खुन्यांचे रक्षण करत आहेत.आमची मागणी अशी आहे की मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या फॉर्म्स, ओटीपीजची माहिती/डेटा एका आठवड्यात जाहीर करावा,” अशी मागणीही त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी, कर्नाटकातील अलांड जागेवरील ६०१८ मते डिलीट करण्याचा कुणीतरी प्रयत्न केला, असा आरोप केला.(Rahul alleges ECI)
ते म्हणाले, ‘‘एका बीएलओच्या लक्षात आले की तिच्या काकांचे मत डिलीट झाले आहे. तिला कळले की तो तिचा शेजारी आहे. जेव्हा तिने त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा शेजाऱ्याने सांगितले की त्याने डिलीट केले नाही किंवा त्यांना त्याबद्दल माहितीही नव्हती.’’
‘‘या प्रकरणात राज्याबाहेरील सॉफ्टवेअर आणि फोन नंबर वापरून ६०१८ मतदारांना डिलीट करण्याचे लक्ष्य करण्यात आले,’’ असे गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी ६३ वर्षीय गोदाबाई नावाच्या एका व्यक्तीचा संदर्भ देत, त्यांचे नाव डिलीट केल्याबद्दलची माहिती दिली. त्यांनी अर्ज केलेला नसतानाही त्यांच नाव डिलीट करण्यात आले. यासंबंधीचा व्हिडिओही त्यांनी दाखवला.(Rahul alleges ECI)
राहुल गांधी यांनी काही सेल फोन नंबरही दाखवले जे मतदार डिलीट करण्यासाठी वापरले गेले होते.
मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांच्यावरील आरोपांबद्दल बोलताना, श्री. गांधी म्हणतात, “१८ महिन्यांत, सीआयडीने निवडणूक आयोगाला १८ पत्रे पाठवली आहेत, ज्यात आयपी पत्ते, ओटीपी तपशील मागितले आहेत.”
“ईसीआय हे तपशील देत नाही,” श्री. गांधी पुढे म्हणाले, “कारण हे तपशील आपल्याला हे केंद्रीकृत ऑपरेशन कुठे होत आहे ते सांगतील.”
“प्रश्न असा आहे : यामागे कोण आहे? भारतीय निवडणूक आयोगाला माहिती आहे, पण ते शेअर करत नाही.” असे ते म्हणाले. दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.