नवी दिल्ली : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाने सनराईज हैद्राबादवर सहा गड्यांनी विजय मिळवला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६९ धावांची खेळी करत हैद्राबादचे २१८ धावांचे आव्हान सात चेंडू राखून पार केले. पंजाबचा हा सलग तिसरा विजय आहे. (Punjab Kings’ Victory over Sunrisers Hyderabad)
हैद्राबादचे २१९ धावांचे आव्हान पार करण्यासाठी पंजाब किंग्जची सलामी जोडी प्रयांश आर्या आणि प्रभासिमरन सिंग ही जोडी मैदानात उतरली. दोघांनी हैद्राबादची गोलंदाजी फोडून काढत ९९ धावांची नाबाद सलामी दिली. प्रियांश आर्यने प्रत्येकी पाच चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने २० चेंडूत ५७ धावा केल्या. प्रभासिमरनसिंगने ५१ धावा २५ चेंडूत केल्या. त्याने प्रत्येकी चार चौकार आणि षटकार खेचले. सलामीची जोडी तंबूत परतल्यावर कर्णधार अय्यरने सामन्याची सुत्रे ताब्यात घेतली. त्याने ३३ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या. त्याने प्रत्येकी पाच चौकार आणि षटकार ठोकले. कुपर कोनोलीने ११, नेहल वढेराने १४ तर शशांक सिंगने नाबाद १६ धावा केल्या. (Punjab Kings’ Victory over Sunrisers Hyderabad)
तत्पुर्वी हैद्राबादने २० षटकात ७ बाद २१९ धावा केल्या. अभिषेक शर्माने झंझावती खेळी करताना २८ चेंडूत ७४ धावा चोपल्या. त्याने तब्बल आठ षटकार ठोकले. ट्रॅव्हिस हेडने २३ चेंडूत ३८ धावा केल्या. कर्णधार इशान किशने २७, क्लासेने ३९ तर अनिकेत वर्माने १९ धावा केल्या. पंजाबच्या अर्शदीपसिंग, शशांक सिंगने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (Punjab Kings’ Victory over Sunrisers Hyderabad)