प्रियांका गांधींनी घेतली अमित शहांची भेट

कोल्हापूर, प्रतिनिधी : खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदेत  भेट घेतली. यावेळी प्रियांका यांनी वायनाडसाठी विशेष पॅकेजची मागणी शहा यांच्याकडे केली. (Priyanka Gandhi)

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहूल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथे झालेल्या पोटनिवडणूकीत प्रियांका गांधी मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाल्या. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी नुकतीच शपथ घेतली. खासदार झाल्यानंतर मतदारसंघाच्या कामासाठी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली.

वायनाड येथे ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भूस्खलनाचा फटका तेथील हजारो नागरिकांना बसला असून अनेकांनी जीव गमावले आहे. नुकसान झालेल्या नागरिकांसाठी प्रियांका गांधी यांनी अमित शहा यांची भेट घेऊन विशेष पॅकेजची मागणी केली. (Priyanka Gandhi)

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले