प्रकाश आबिटकरांना मंत्रीपद देऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर; प्रतिनिधी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्याचे काम केले आहे.मतदारसंघातील कामासाठीच ते भेटले. जनतेच्या कामाशिवाय न भेटणारा आमदार म्हणजे आबिटकर असून त्यांचे कार्य त्यांच्या विकास कामातून दिसून येते.येत्या विधानसभा निवडणुकीत ते जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (Prakash Abitkar)

राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील दोनशे कोटींहून अधिक विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच पुर्ण कामांचे लोकार्पण या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी आयोजित गारगोटी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. माजी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, एकापेक्षा एक नवीन प्रकल्पांना निधीची मागणी आम्ही सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करीत होतो. गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी निधी दिला. त्यामुळे सर्व प्रकल्पांची कामे तातडीने सुरू झाली. मतदारसंघातील पाणी प्रकल्पांना सहाशे कोटी निधी लागणार होता. तो मिळाल्यामुळेच मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करू शकलो. (Prakash Abitkar)

आजरा भुदरगड उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम ६.७७ कोटी रूपयांच्या निधीमधून पुर्ण करण्यात आले आहे. ५९ महसुली सजे, ९ मंडळे आणि २१३ गावांचा समावेश आहे. उपविभागातील दोन्ही तालुक्यांची लोकसंख्या २.७० लाख आहे. तसेच भूमिपूजन झालेल्या गारगोटी ता. भूदरगड तहसीलच्या दुमजली इमारतीच्या बांधकामासाठी १०.७६ कोटी रू. निधी मंजूर आहे. रक्कम रूपये १४.५६ कोटींच्या तहसिल कार्यागलय राधानगरी इमारतीचे भूमिपूजनही ऑनलाईन स्वरूपात यावेळी झाले.

दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामाचाही झाला शुभारंभ

दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ऑनलाईल स्वरूपात गारगोटी येथून झाला. दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्प हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील आसनगाव गावाजवळ असून दूधगंगा नदीवर एकूण २५.४० अ.घ.फू. क्षमतेचे धरण बांधण्यात आले आहे. प्रकल्पाद्वारे कोल्हापूर जिल्हयामधील राधानगरी, भुदरगड, कागल, हातकणंगले, शिरोळ व करवीर असे एकूण ६ तालुक्यातील एकुण १२५ गावातील ४६९४८ हे. क्षेत्र व कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील एकूण १२९८५ हे. असे एकूण ५९९३३ हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पास काळम्मावाडी प्रकल्प म्हणून देखील ओळखले जाते.

वयोश्री योजनेचा शुभारंभ

या कार्यक्रमात वयोश्री योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश वाटप करून करण्यात आला. मतदारसंघातील तब्बल १३ हजार लाभार्थी पात्र ठरले. याचे गुरुवारी सकाळी पैसे जमा होणार आहेत.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी