आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

Praful Hinge's Record in the IPL

नवी दिल्ली : प्रतिनिधी : यंदाच्या आयपीएलमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचे तीन स्टार खेळाडूंना तंबूत परतवण्याची किमया विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगने केली. पदार्पणातच पहिल्या षटकात तीन गडी बाद करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. सनराईज हैद्राबादकडून पदार्पण करणाऱ्या हिंगने चार षटकात ३४ धावा देत ४ गडी बाद केले. एकेकाळी पाठीच्या दुखापतीपासून क्रिकेटला राम राम ठोकण्याचा विचार करत असताना वरुन अरॉन आणि ग्लेन मॅकग्रांनी पुन्हा उभारी घ्यायला लावली आणि सोमवारी त्याने इतिहास घडवला. (Praful Hinge’s Record in the IPL)

हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावा जमवल्या. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या रायस्थान रॉयलची पहिल्याच षटकात प्रफुल्ल हिंगने दाणादाण उडवली. पहिल्या षटकात फटकेबाज वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि ल्हानडे प्रिटोरियला बाद करत रायस्थान रॉयलची स्थिती ३ बाद १ अशी केली. त्यानंतर दुसऱ्या षटकात रायस्थान रॉयलचा कर्णधार रियान परागला माघारी धाडताना स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले.

हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना सहा बाद २१६ धावा केल्या. अभिषेक शर्माला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर कर्णधार इशान किशनने सुत्रे हातात घेतली. त्याने ४४ चेंडूत ९१ धावा चोपून काढल्या. आठ चेंडू सीमापार केले तर सहा चेंडू सीमेरेषेबाहेर भिरकावले. त्याला हेन्सीच क्लासेन ४०, नितीश कुमार रेड्डी,४० ट्रॅव्हिस हेडने १८ साथ दिली. सलील अरोराने बाद २४ धावा केल्या. (Praful Hinge’s Record in the IPL)

राजस्थान रॉयलला प्रफुल्ल हिंगने सलामीच्या षटकात धक्के दिले. वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि ल्हानडे प्रिटोरियला बाद केले. साकिब हुसेनने यशस्वी जयस्वालला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकात हिंगने कर्णधार रियान परागला बाद केले. रवींद जडेजा आणि डोनाव्हॅन फेरारियाने तुफान फटकेबाजी करत सामन्यात कमबॅक केले. फेरारीने ४४ चेंडूत ६९ तर जडेजाने ४५ धावा केल्या. दोघे बाद झाल्यावर राजस्थान रॉयलचा डाव ढेपाळला. १९ षटकात राजस्थान रॉयलचा डाव संपुष्टात आला. प्रफुल्ल हिंगे आणि साकिब हुसेनने प्रत्येकी चार गडी बाद केले.

अरॉन, मॅकग्राने उभारी दिली

. अडीच वर्षापूर्वी प्रफुल्ल हिंगेला पाठीची दुखापत झाली. जवळजवळ त्याची कारकीर्द संपल्यासारखी वाटत होती. पण त्याला वरुण अरॉन आणि ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू ग्लेन मॅकग्राची मदत मिळाली. प्रफुल्लला स्ट्रेस फॅक्चर झाले होते. वरुण अरॉनने त्याला बरे होण्यास मदत केली. चैन्नईतील एमआयएफ पेस फाउंडेशनचे प्रशिक्षक संचालक मॅकग्राने त्याला ऑस्ट्रेलियाला आमंत्रित केले. ब्रिस्बेन येथील क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट केंद्रात तीन आठवड्याचे प्रशिक्षण घेतले. तिथे त्याच्या गोलंदाजीत सुधारण झाली. वरुण अरॉनने त्याच्या रन अप, गोलंदाजी अक्शन आणि फॉलो थ्रूमध्ये काही तांत्रिक बदल केले आहे. (Praful Hinge’s Record in the IPL)

Related posts

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय

‘खंडोबा’ने उडवला ‘जुना बुधवार’चा धुव्वा