भ्रष्टाचारी की भ्रष्टाचाराचा डाग नसलेला उमेदवार हे जनतेनेच ठरवावे : स्वाती कोरी

उत्तूर; प्रतिनिधी : एकीकडे भ्रष्टाचाराने बरबटलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा डागही नसलेले, निष्कलंक, उच्चशिक्षित, छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे कागल, गडहिंग्लज-उत्तूरच्या विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. जनतेने या दोन उमेदवारांची तुलना करुन मतदान करावे, असे आवाहन जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी केले. (Swati Kori)

बहिरेवाडी (ता.आजरा) महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. दरम्यान भादवण येथे सत्यम मंडळ व संस्कार फौंडेशनच्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी समरजितसिंह घाटगे यांना पाठींबा दिला.

यावेळी उमेदवार समरजितसिंह घाटगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, रणजीत पाटील, दिग्विजय कुराडे, दिलीप माने, सागर कोंडेकर, दयानंद पाटील,  प्रकाश कुंभार, संजय धुरे, प्रवीण लोकरे, अरुण व्हरांबळे, रमेश ढोणुक्षे, विश्वजीत पाटील, प्रकाश चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सौ. कोरी पुढे म्हणाल्या, हसन मुश्रीफ यांनी वडीलांसमान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी गद्दारी केली.त्याचप्रमाणे त्यांनी जेष्ठ समाजवादी नेते,आमचे वडील श्रीपतराव शिंदे यांचीही फसवणूक करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला.त्यांचा अपमान केला. याचा वचपा काढण्यासाठी कुणाच्या बापालाही न घाबरणारे जनता दलाचे कार्यकर्ते समरजितराजेंच्या प्रचारात आघाडीवर राहतील. यावेळी चंद्रकांत गोरुले, रमेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सुहास चौगुले यांनी स्वागत केले. उल्का गोरुले यांनी आभार मानले.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी