‘पद्मासन’

बदललेल्या जीवनशैलीत योगाचे आपल्या आयुष्यात महत्त्व मोठे आहे. नियमित योगाच्या सरावाने ताणतणाव कमी होतो. याबरोबरच माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. योगासनात विविध आसने असून यामधील एक आसनप्रकार म्हणजे ‘पद्मासन’ होय. ‘पद्म’ म्हणजे कमळ. हे आसन करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचा आकार कमळासारखा होतो म्हणून या आसनाला पद्मासन किंवा कमलासन म्हणतात. ज्याप्रमाणे कमळ चिखल व पाणी यातून वर येऊन उमलते त्याप्रमाणे या आसनात स्थिर व स्थितप्रज्ञ होता येते. हे खूप शक्तिशाली आसन आहे. पाठीच्या आणि हृदयाच्या आजारांसाठी हे सर्वोत्तम आसन आहे. योगशास्त्रात त्याचे सर्व शारीरिक आणि आध्यात्मिक फायदे सांगितले आहेत. मेडिटेशनसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे.

कृती

सुरवातीला योगा मॅटवर सरळ बसावे. पाठीचा कणा ताठ करावा. पाय सरळ ठेवून पसरुन घ्यावेत. हळूहळू उजवा गुडघा वाकवून आणि डाव्या मांडीवर ठेवावा. टाचांनी ओटीपोटाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. असेच दुसऱ्या पायासोबत करताना त्या पायाचा स्पर्श ओटीपोटाला करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय आता एकमेकांच्या विरुद्ध दिशेला झाल्यानंतर तुमचे हात तुमच्या इच्छेप्रमाणे ठेवावे. यावेळी डोके आणि पाठीचा कणा सरळ ताठ ठेवावा. मोठा आणि दीर्घ श्वास घ्यावा.

डोके हळूहळू खालच्या दिशेने घ्यावे. हनुवटीने गळ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसरा पाय ठेवून याचा सराव करत रहावे.

पद्मासनाचे विविध प्रकार

अर्ध पद्मासन, स्केल पोझ, आसनस्थ माऊंटन पोझ, हाप लोटस पोज आर्म्स रेझ्ड फॉरवर्ड बेंड फ्लो, हाप लोटस पोज, हॅण्डस् फ्लो, प्रॉप्ससह हाप लोटस आदी पद्मासनाचे विविध प्रकार आहेत.

पद्मासनाचे फायदे

 पद्मासन हे आसन केल्याने आपल्या शरीराला भरपूर फायदे मिळतात. जर तुम्हाला कधी अशांत असाल आणि तुम्हाला बैचेन वाटत असेल तर पद्मासनाचा सराव केल्यास  तुमचे मन शांत ठेवण्यात हे योगासन मदत करेल. हे आसन अलौकिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी, मेडिटेशन किंवा ध्यान करण्यासाठी करतात.

स्नायू मजबूत होतात : पद्मासन विशिष्ट सांध्यांना लक्ष्य करते, गुडघे आणि श्रोणि आणि खालच्या सांध्यातील स्नायू मजबूत करते. हे एकूण संयुक्त लवचिकता वाढवते. हे बसलेले आसन पाठीचा कणा लांबवते आणि घोट्याच्या सांध्याची लवचिकता सुधारते.

रक्तदाबाचा त्रास कमी होतो : पद्मासन नियमितपणे केल्याने रक्तदाबाचा त्रास कमी होतो.

श्वासोच्छवास सुधारतो : पद्मासन करताना तालबध्द नमुन्यांचा सराव होतो. श्वासोच्छ्वास आणि श्वास सोडणे यामुळे तुमच्या फुफ्फुसाची क्षमता सुधारते.

उर्जा पुर्नज्जीवीत होते : पद्मासन मणक्याचे स्थिर संरेखन राखते व तुमच्या शरीराची उर्जा पुर्नज्जीवित करण्यात मदत करते.

पचनसंस्था मजबूत होते : पद्मासन योगासनामुळे पाचन अवयवांमध्ये रक्त प्रवाह सुधारतो आणि बद्धकोष्ठता आणि लूज मोशन यासारख्या पाचन समस्यांचे निराकरण होण्यास मदत होते. हे पाचन तंत्र स्वच्छ करते, चयापचय कार्य वाढवते.

पोटाचा हलका मसाज होतो. रक्त प्रवाह व्यवस्थित होतो.

एकाग्रता वाढते : या आसनात स्थिर होता येत असल्यामुळे एकाग्रता वाढते. चिंता कमी होते.

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ