कोल्हापूर : शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेकदिन सोहळा न्यू पॅलेस दरबारात उत्साहात साजरा करण्यात आला. खासदार शाहू महाराज यांनी यावेळी देशवासीयांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शहाजी म्युझीयम ट्रस्ट, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टने सोहळ्याचे आयोजन केले होते. (New Palace)
पावसामुळे नवीन राजवाड्याच्या प्रांगणात नियोजीत सोहळा यंदा न्यू पॅलेसमधील मुख्य राजदरबारात घेण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता शिवछत्रपतींच्या सुवर्ण मूर्तीवर यशराजराजे यांच्या हस्ते अभिषेक झाला. कवड्याची माळ व पुष्पहार-फुले वाहून पूजन करण्यात आले. यानंतर खासदार शाहू महाराज, सौ. याज्ञसेनी महाराणी, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे आदींनी शिवछत्रपतींच्या मूर्तीस अभिवादन केले. छत्रपतींचे राजोपाध्ये बाळकृष्ण दादर्णे यांच्या मंत्रोच्चारात राज्याभिषेक सोहळ्याचे सर्व विधी झाले. (New Palace)
बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या पाईप बँण्ड पथकाने स्फूर्तीदायी गीतांचे सादरीकरण करून वातावरण निर्मिती केली. शाहिर विशारद डॉ. आझाद नायकवडी व पथकाने शिवराज्याभिषेक गीतासह स्फूर्तीदायी पोवाड्याचे सादरीकरण केले. छत्रपती शाहू विद्यालयातील एनसीसी व तारा कमांडो फोर्सच्या विद्यार्थ्यांनी शिवस्फूर्ती गीत, शिवकालीन युध्दकला आणि झांज व ढोलताशा पथकाचे सादरीकरण करून कार्यक्रमाला चांगलाच साज चढविला. (New Palace)
सोहळ्यास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुप्रिया देशमुख, सरदार घराण्यातील सदस्य कर्नल विजयसिंह गायकवाड, ऋतुराज इंगळे, निलराजे पंडित -बावडेकर, बाळ पाटणकर, रणजीतसिंह व संग्रामसिंह चव्हाण (हिंम्मत बहाद्दर), शिवराज गायकवाड, देवेंद्र व प्रद्युम्न खर्डेकर, प्राणिल इंगळे, धैर्यशील यादव, विश्वजीत घाटगे, इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार व इंद्रजीत सावंत, शिवसेनेचे विजय देवणे, युवा सेनेचे हर्षल सुर्वे, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, उद्योजक आनंद माने व तेज घाटगे, जयेश ओसवाल, माजी नगरसेवक ईश्वर परमार, अर्जुन माने, राजाराम गायकवाड, अश्किन आजेकर, प्रकाश पाटील, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र चव्हाण, बाबा राजेमहाडिक, मल्हार सेनेचे बबनराव राणगे, आम आदमी पक्षाचे संदिप देसाई, अनिसचे उमेश सूर्यवंशी, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, माणिक मंडलिक, लाला गायकवाड, विक्रम जरग, अनिल पाटील, सुशिल भांदिगिरे, शुभम शिरहट्टी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (New Palace)