मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून अभिनेत्री नीलम शिर्केची माघार

Neelam Shirke withdraws from the Marathi Film Corporation elections

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून अभिनेत्री नीलम शिर्के यांनी माघार घेण्याची घोषणा केली आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासाठी माघार घेत असल्याचे शिर्के यांनी सांगितले. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय पक्ष उतरले असून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नीही रिगणात उतरल्या आहेत. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

अभिनेत्री निलम शिर्के यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये असे म्हटंले आहे की, मी स्वतः मराठी नाटके, चित्रपट, मालिका या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून रंगभूमीची सेवा करीत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंग भूमी परिषद या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील सर्व घटकांच्या हितवृद्धीच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रातील कलाकार कामगारांसहित इतर सर्व घटकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेसाठी आपण योगदान द्यावे असा विचार मनात होता. (Neelam Shirke withdraws from the Marathi Film Corporation elections)

नुकतीच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणुक जाहीर झाली. चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष  मेघराज राजे भोसले आणि अभिनेते आनंद काळे या दोघांनीही मी या निवडणुकीत उभे राहण्याबद्दल आग्रही विनंती केली. त्यांचा मान राखून सदर निवडणुकीत सहभागी होण्याचे मी ठरवले होते आणि त्या अनुषंगाने लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून मी स्वतः अभिनेत्री या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.

दरम्यान चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाच्या सदस्य असलेल्या वर्षाताई उसगावकर यावर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नसल्याचे मला स्वतः मेघराज राजे भोसले यांनीच कळविले होते, तथापि अभिनेत्री प्रवर्गातून वर्षाताईंनी अर्ज दाखल केल्याचे मला माझा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता कळाले, मुळात वर्षाताई यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधात निवडणूक लढवून चित्रपट महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. (Neelam Shirke withdraws from the Marathi Film Corporation elections)

आज सकाळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांच्यासहित काही जेष्ठ रंगकर्मीशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे.वर्षाताईसहित चित्रपट आणि नाट्यसृष्टीत कार्यरत असणाऱ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान राखून मी या निवडणुकीत वर्षाताई उसगावकर यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कार्यालयीन बाब उद्या पूर्ण करण्यात येईल. (Neelam Shirke withdraws from the Marathi Film Corporation elections)

Related posts

कांदा दरवाढीच्या मागणीसाठी महाविकास आघाडी रस्त्यांवर

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचे नाव

अमेरिकेचा इराणवर हल्ला; शांतता चर्चेला तडा?