Navy lieutenant killed in attack: आठवड्यापूर्वीच लग्न आणि…

vinay narwal

नवी दिल्ली : आठवड्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. हे दोघे पहेलगाममध्ये सुटीचा आनंद लुटण्यासाठी आले होते, पण दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात या दाम्पत्यापैकी पतीचा मृत्यू झाला. विनय नरवाल असे त्यांचे नाव. भारतीय नौदलात ते लेफ्टनंट होते. ते मूळचे हरियाणातील करनाल येथील आहेत. (Navy lieutenant killed in attack)

त्यांचे पार्थिव बुधवारी विमानाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नीने फोडलेला हंबरडा उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता. या प्रसंगाचे हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आपल्या पतीला आदरांजली वाहताना त्यांचा स्वर कंप पावत होता. थरथरत्या स्वरात त्या म्हणाल्या, ‘‘त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांनी चांगले जीवन जगले. त्यांनी आम्हाला खरोखर अभिमान दिला. हा अभिमान जपला पाहिजे.’’ (Navy lieutenant killed in attack)

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, १६ एप्रिल रोजी या जोडप्याचे लग्न झाले होते. ते पहलगाममध्ये सुट्टीचा आनंद लुटत होते.

यावेळी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी नरवाल यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी नरवाल यांच्या पत्नीचे  सांत्वन केले. त्यांना धीर दिला.

नरवाल यांचे पार्थिव हरियाणाच्या करनाल येथे नेण्यात येणार आहे. दरम्यान, आमदार जगमोहन आनंद यांनी करनाल येथे त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी नरवाल यांच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. (Navy lieutenant killed in attack) पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या दुःखद निधनाने सीएनएस अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि भारतीय नौदलाचे सर्व कर्मचारी स्तब्ध आणि दुःखी आहेत. या अकल्पनीय दुःखाच्या क्षणी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो. या भयंकर हिंसाचारात प्राण गमावलेल्यांच्या सर्व कुटुंबीयांसोबत भारतीय नौदल एकजुटीने उभे आहे, असे नौदलाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related posts

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक