ख्रिस्ती मिशनरीची हत्या, ओरिसा विधानसभेवरील हल्ला आणि खासदार सारंगी

नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान गुरुवारी संसदेबाहेर झालेल्या कथित धक्काबुक्कीवेळी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावरून भाजपही आक्रमक झाल्यानंतर हे दोन खासदार कोण आहेत, याविषयीची उत्सुकता ताणली होती. (Pratap Sarangi)

खासदार सारंगी हे निष्ठावंत हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केओंझारमध्ये जाळून मारले होते. तेव्हा सारंगी हे बजरंग दलाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी या प्रकरणात वाधवा आयोगासमोर साक्ष देताना मुख्य आरोपी दारा सिंह याचा बजरंग दलाशी संबंध नव्हता, असे सांगितले होते. सारंगी यांनी राज्य विहिंप युनिटचे वरिष्ठ सदस्य म्हणूनही काम केले आहे.

बजरंग दलासह हिंदूत्ववादी उजव्या विचारसरणीच्या गटांनी २००२ मध्ये ओरिसा विधानसभेवर हल्ला केला होता. त्यावेळी दंगल, जाळपोळ, हल्ला आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली ओडिशा पोलिसांनी सारंगी यांना अटक केली होती. (Pratap Sarangi)

लोकसभा निवडणूक लढण्याआधी सारंगी हे दोन वेळा आमदार होते. २००२ मध्ये ते भाजपचे उमेदवार म्हणून तर २००९  मध्ये निलागिरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले होते.

ब्रह्मचारी की अविवाहीत?

ओडिशात सारंगी यांना साधा आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी, ओटीव्ही या प्रादेशिक वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना ते ‘अविवाहित’ आहेत की ‘ब्रह्मचारी’ आहेत असे विचारण्यात आले. त्यावर सारंगी यांनी लगेच ‘अविवाहित’ आणि नंतर ‘नाही,’ असे उत्तर दिले होते. (Pratap Sarangi)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, सारंगी यांनी दोन दिग्गजांचा पराभव केला. तत्कालीन खासदार रवींद्र कुमार जेना आणि प्रदेश काँग्रेसचे तत्कालीन प्रमुख निरंजन पटनायक यांचे पुत्र नवज्योती पटनायक यांचा १२,००० पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता.

२०२४ च्या निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सारंगी यांची ४५.५ लाखांची जंगम मालमत्ता आणि ४.३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. पेन्शन आणि शेती हे त्याचे उत्पन्नाचे स्रोत असून त्यांच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत. (Pratap Sarangi)

मुकेश राजपूत

मुकेश राजपूर उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी त्यांना पहिल्यांदा संधी दिली होती. राज्यातील प्रमुख लोध नेत्यांपैकी एक मानले जातात.

सिंग यांच्या जवळचे म्हणून ते ओळखले जात. २०१४ च्या निवडणुकीत खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांचा पराभव करून राजपूत जायंट किलर ठरले होते. त्यानंतर राजपूत यांनी बसपा उमेदवार मनोज अग्रवाल आणि खुर्शीद यांचा पराभव केला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजपूत पुन्हा विजयी झाले. परंतु यावेळी त्यांनी सपाचे नवल किशोर शाक्य यांचा केवळ २,००० मतांच्या फरकाने पराभव केला.

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले