Headmaster arrested : लाच घेताना मुख्याध्यापक जाळ्यात

Headmaster arrested

कोल्हापूर : प्रतिनिधी : शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना शाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संजय जयसिंग नार्वेकर (वय ५२ रा. सांगाव रोड, दत्त कॉलनी, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. (Headmaster arrested)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. रविवार पेठेत शेलाजी वन्नाजी विद्यालय ही शाळा आहे. या शाळेत तक्रारदाराचे वडील आणि पाच चुलते शिकायला होते. सरकारी कामासाठी तक्रारदारांच्या वडील आणि पाच चुलत्यांच्या शाळा सोडल्याचा दाखला हवा होता. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक संजय नार्वेकर यांची भेट घेतली. एक दाखल्याचे पाचशे रुपये या प्रमाणे सहा दाखल्यासाठी मुख्याध्यापकांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. (Headmaster arrested)

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. मुख्याध्यापक संजय नार्वेकर तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंके, हेड कॉन्स्टेबल विकास माने, सुनील घोसाळकर, पोलिस नाईक सचिन पाटील, संदीप पवार यांनी कारवाईत भाग घेतला. (Headmaster arrested)

हेही वाचा :  

Related posts

मंदिराचा सभा मंडप कोसळून सात भाविकांचा मृत्यू

पवनराजे निंबाळकर हत्या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातले आरोपी का सुटले?