Murder in Madarasa : मदरशात लहान मुलांचा विजेचा शॉक देऊन खून

Murder in Madarasa

कोल्हापूर : प्रतिनिधी : मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी विजेचा शॉक देऊन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीने मुलाने त्याचा सहकारी असलेल्या लहान वयाच्या मित्राचा तोंडात कापडी बोळा कोंबून खून केल्याची घटना घडली आहे. मयत मुलगा बिहार असून या मदरशात अनेक परराज्यातील मुलांचा समावेश असल्याने पोलिसांनी गुन्ह्याचा कसून तपास सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील मदरशात ही घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी भेट देऊन गुन्हाचा आढावा घेतला. (Murder in Madarasa)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आळते येथील निजामिया मदरशात तब्बल साठ हून अधिक मुले धार्मिक शिक्षण घेत आहेत. १६ जून रोजी पहाटे पाच वाजता फैजान नजिम (वय ११ ) या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी भेट दिली.  सीसीटीव्ही च्या आधारे आणि चौकशी द्वारे तपास सुरू केला. यावेळी याच मदरशात शिकणारा अल्पवयीन मुलगा संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी रविवारी रात्री मदरशात झोपलेल्या फैजान नजिम या अल्पवयीन मुलाच्या तोंडात कापडाचा गोळा घालून त्याला इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले. (Murder in Madarasa)

संशयित मुलाची चौकशी करत असताना सुरवातीला अल्पवयीन मुलगा घाबरून काहीही सांगत नव्हता. त्याला बोलते करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना व मानसोपचार तज्ञांना बोलवलं. यानंतर अल्पवयीन मुलगा त्यांच्यासोबत बोलता झाला आणि त्याने सुट्टी मिळावी आणि घरी जाता याव यासाठी खून केल्याच कबुली दिली.

या घटनेनंतर या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात आणखी काही मुलांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यानुसार आणखी दोन अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे तसेच या घटनेची खोलवर तपास करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार संशयित आणि खून करण्यासाठी वायर कोठून आणली आणि कोठे लपवले आहे याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. मात्र अशा मदरशांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि धार्मिक शिक्षणामुळे मानसिकतेवर होणारे परिणाम तसेच त्यांच्या बाल हक्कांवर आलेले बंधन यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Murder in Madarasa)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?