मुंबईत बोट बुडाली; दोघा प्रवाशांचा मृत्यू

मुंबई; प्रतिनिधी : फेरी बोट उलटून मुंबईत दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. आणखी पाचजण बेपत्ता आहेत. गेट वे ऑफ इंडियाहून घारापुरी लेण्याकडे ८० प्रवासी घेऊन ही बोट निघाली होती. बोटीवर पाच कर्मचारी होते. प्रवासादरम्यान एका स्पीड बोटीने फेरी बोटीला धडक दिली. त्यामुळे ही दुर्घटना घडली. (Mumbai Boat)

अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ८० प्रवासी घेऊन जाणाऱ्या ‘नीलकमल’ या बोटीजवळून पुढे जात पुन्हा बोटीच्या दिशेने वेगाने येत स्पीड बोट धडकल्याचे दिसत आहे. ७५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित लोकांची प्रकृती स्थिर असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

नौदल आणि तटरक्षक दलाने मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम सुरू केली आहे. नौदलाच्या ११ नौका आणि सागरी पोलिसांच्या तीन बोटी आणि तटरक्षक दलाची एक बोट या माध्यमातून शोध आणि बचावकार्य सुरू आहे. शोध आणि बचाव कार्यात चार हेलिकॉप्टरही सहभागी आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. (Mumbai Boat)

महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे सीईओ माणिक गुरसाल यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या ५६ जणांना नवी मुंबई, १० जणांना मुंबई डॉकयार्ड आणि नऊ जणांना गेटवे ऑफ इंडिया येथे सुखरुप नेण्यात आले आहे. पाच जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘कोस्ट गार्ड आणि नौदल शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. मुंबई बंदर प्राधिकरणाच्या हार्बर मास्टरने तटरक्षक दलाला सतर्क केले आणि बचाव आणि शोधकार्य सुरू केले,’ असे तटरक्षक दलाचे महानिरीक्षक भीष्म शर्मा यांनी सांगितले. (Mumbai Boat)

हेही वाचा :

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ