MP Priyanka Gandhi attacked BJP: संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे

नवी दिल्ली : भारताचे संविधान म्हणजे संघाचा कायदा नव्हे; तर ते देशातील सामान्य जनतेसाठी न्याय, आकांक्षा, अभिव्यक्ती आणि आशेचे ते कवच आहे. ते लोकांच्या मनात धाडसाची भावना निर्माण करते, असे मत खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी व्यक्त केले. संविधानाने सरकार बनवण्याचा किंवा तोडण्याचा अधिकार लोकांना दिला आहे, असे त्या म्हणाल्या. (MP Priyanka Gandhi attacked BJP)

वायनाडच्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन सभागृहात आलेल्या खासदार प्रियांका गांधी यांनी त्यांच्या पहिल्याच तडाखेबंद भाषणांत भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. देश कधीही संघाचा राहिला नाही. तो कधीही ‘भ्याडांच्या हातात’ जास्त काळ राहिला नाही, असे त्या म्हणाल्या.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यघटना बदलता येणार नाही हे भाजपला कळून चुकले आहे. सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संगनमत आहे, याचा पुनरूच्चार करून प्रियांका गांधी यांनी ‘केंद्र सरकार केवळ अदानींसाठी काम करते, सबंध भारतीय जनतेला वाटते.’

प्रियांका यांनी कुटुंबाचाही भक्कम बचाव केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी खासदार राहुल गांधी यांच्या यात्रेवर केलेल्या टोमण्यालाही प्रत्युत्तर  दिले. राहुल गांधींच्या ‘मोहब्बत का दुकान’मध्ये करोडो लोक सामील झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही लोकांशी संपर्क ठेवत नसल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली.(MP Priyanka Gandhi attacked BJP)

‘आपण सर्वांनी राजाबद्दलची कथा वाचली आहे जो लोकांशी संवाद साधण्यासाठी आपला पोशाख बदलून त्याच्या कारभारावर त्यांचा अभिप्राय मिळवत असे. आजच्या राजाला कपडे बदलायला आवडतात पण लोकांचे ऐकण्याचे धाडस त्याच्यात नाही. सभागृहात अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत, पण गेल्या पंधरा दिवसांत पंतप्रधान केवळ १० मिनिटेच दिसले. पंतप्रधानांना संभल आणि मणिपूरवरही बोलावेसे वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.

लोकसभेत चर्चेला सुरुवात करणारे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भूतकाळात काँग्रेसने संविधानाचा कसा दुरुपयोग केला याची आठवण करून दिली. त्यांना प्रत्युत्तर देताना प्रियांका यांनी संभलमधील जातीय हिंसाचार, उन्नावमधील महिलेवर झालेला बलात्कार, आग्रा येथील एका कामगाराची हत्या, मणिपूरमधील जातीय हिंसाचार या घटनांकडे लक्ष वेधले. राज्यघटनेने जनतेला दिलेली सुरक्षा हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा :

पदाच्या लालसेने धनकड यांच्याकडून पक्षपातीपणा

सोनिया गांधीः चावीची बाहुली ते सरकारचा रिमोट

https://x.com/PTI_News/status/1867500933640323366

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली